आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेट्स यांना कोरोना:मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना बूस्टर डोस घेऊनही कोरोनाची लागण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेट्स यांना कोरोनाची लागण झाली असली तरी, त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कोरोना झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते सध्या विलगीकरणात आहे. जोपर्यंत आपण ठीक होत नाहीत, तोपर्यंत एकटे राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. बिल गेट्स म्हणाले की, “मी भाग्यवान आहे की, मला लसीकरण करण्यात आले आहे आणि मी बूस्टर देखील घेतला आहे आणि मला चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे.”

बिल अँण्ड मलिंडा गेट्स फाऊंडशेन हे जगातील सर्वात प्रभावशाली खाजगी संस्थांपैकी एक आहे. ज्याची एकूण संपत्ती अंदाजे 65 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. बिल गेट्स हे महामारी रोखण्यासाठी उचललेल्या पावलांचे समर्थक आहेत. विशेषतः गरीब देशांमध्ये ते लोकांसाठी लस आणि औषधे उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत.

गेट्स फाऊंडेशनने ऑक्टोबरमध्ये जाहीर केले आहे की, ते औषध निर्माते मर्कच्या अँटीव्हायरल कोविड 19 गोळीची जेनेरिक आवृत्ती कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आणण्यासाठी 120 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करेल.

बिल गेट्स गरीब देशांमध्ये लस पोहोचवण्याचे काम करत आहेत

सिएटलमध्ये असलेले बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन ही जगातील सर्वात प्रभावशाली खाजगी संस्था आहे, ज्याचा निधी सुमारे $65 अब्ज आहे. मलिंडा गेट्स ही गेट्स यांनी पत्नी होती, मात्र त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. बिल गेट्स हे महामारी रोखण्यासाठी अनेकांना मदत करतात. या संस्थेच्या माध्यमातून गरीब देशातील लोकांपर्यंत लस आणि औषधे पोहोचवण्याचे काम ते करत आहेत. बिल गेट्स हे जागतिक साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठीच्या उपायांचे, विशेषत: गरीब देशांना लसी आणि औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेट्स फाऊंडेशनने ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, ते औषध कंपनी मर्कच्या अँटीव्हायरल कोविड-19 गोळीची जेनेरिक औषधे कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी 120 दशलक्ष डॉलर खर्च करतील.

बिल गेट्स यांनी महामारीबद्दल चिंता केली व्यक्त

कोरोना महामारीच्या वाढत्या उद्रेकादरम्यान, CEPI ला दान केलेली रक्कम कोविड संसर्गाविरुद्धच्या लढाईसाठी वापरली जाईल, अशी घोषणा गेट्स यांनी केली होती. यासोबतच भविष्यातील साथीच्या आजारांसाठीही आपण हवी ती मदत करणार, असे ते म्हणाले होते. संपूर्ण जग वेगाने पसरणाऱ्या व्हायरसच्या आव्हानाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, लसींमुळे बरेच लोक वाचले आहेत आणि संसर्गातून खूप लवकर बाहेर पडले आहेत. विकसनशील देशांना पाहिजे तितक्या लवकर लस मिळाली नाही, असेही ते म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...