आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Migration Of Hindu Community Under Terror After Temple Demolition; Provide 24 hour Security To All Shrines; Demand For Minority MPs; News And Live Updates

ग्राउंड रिपोर्ट:मंदिराच्या तोडफोडीनंतर दहशतीच्या सावटाखाली हिंदू समुदायाचे स्थलांतर; सगळ्या धर्मस्थळांना 24 तास सुरक्षा द्या; अल्पसंख्याक खासदारांची मागणी

बांग शरीफ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानातील पंजाब प्रांतात दहशतीचे सावट, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 50 दहशतवाद्यांना अटक

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम जिल्ह्यात बांग शरीफमध्ये गेल्या बुधवारी दहशतवाद्यांनी हिंदू मंदिरावर हल्ला करून त्याची तोडफोड केली होती. तेव्हापासून स्थानिक लोक दहशतीखाली वावरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या आदेशानंतर ५० दहशतवाद्यांना अटक झाली. मंदिराची देखभाल व सौंदर्यीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. हे काम ९० टक्के पूर्ण झाल्यानंतर मंदिर हिंदू समाजाकडे सोपवले जाणार आहे. मंदिर व परिसरात पोलिस तसेच जवान तैनात केले जाणार आहेत.

आता परिस्थिती सामान्य होत चालली आहे आणि दुकाने पुन्हा सुरू होत आहेत. परंतु हिंदू समुदायातील व्यापाऱ्यांच्या दुकानांना टाळे दिसून येते. येथील स्थानिक हिंदू परिवार सिंध व पंजाबमध्ये राहणाऱ्या नातेवाइकांकडे जात आहेत. या मुद्द्यावर कुणी काही बोलण्यासही धजावत नाही. श्रीनाथही त्यापैकीच आहेत. त्यांचे कुटुंब लरकानामधील जवळच्या नातेवाइकाच्या घरी जात आहेत. ते म्हणाले, स्थानिकांच्या मनात प्रचंड दहशत पसरली आहे. काही माथेफिरूंनी या भागातील सौहार्द बिघडवले आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर आम्ही परत येऊ. एका हिंदू कुटुंबाने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. आम्ही पोलिसांना कल्पना दिली होती. ते वेळेवर आले असते तर दहशतवाद्यांना रोखता आले असते. मंदिरात आता पूजा सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

८ वर्षीय मुलावर ईशनिंदेचा आरोप करून दहशतवाद्यांचे कृत्य
कट्टरवाद्यांनी केवळ ८ वर्षांच्या मुलावर ईशनिंदेचा आरोप करून मंदिरावर हल्ला केला होता. एका मदरशातील ग्रंथालयातील कार्पेटवर जाणूनबुजून लघुशंका केली होती, असा त्याच्यावर ठपका आहे. पोलिसांनाही पाचारण केले गेले. परंतु मूल अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलाची सुटका केली होती. आमच्या मुलाने अवमान केलेला नाही. उलट मदरशात गेल्यानंतर भीती दाखवल्यामुळे मुलगा घाबरून गेला होता. हिंदू व मुस्लिम लोकांची एक सौहार्द समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती धार्मिक संघर्षातून तोडगा काढणार आहे.

सगळ्या धर्मस्थळांना २४ तास सुरक्षा द्या; अल्पसंख्याक खासदारांची मागणी
पाकिस्तानच्या संसदेने या प्रकरणात प्रस्ताव पारित करून घटनेचा निषेध केला. संपूर्ण देश अल्पसंख्याक समुदायाच्या बाजूने आहे. या प्रकरणात अल्पसंख्याक हिंदू दहशतीखाली आहेत, असे हिंदू समुदायाचे प्रतिनिधी रमेश लाल यांनी दैनिक भास्करला सांगितले. घरेदारे सोडून जाण्याची वेळ या लोकांवर आली आहे. अशा घटना रोखायच्या झाल्यास कडक कायद्याची गरज भासते. पाकिस्तानात होणाऱ्या मंदिरांवरील हल्ल्यामागील कारण काय, असे विचारले असता. ते म्हणाले, पाकिस्तानातील कट्टरवाद संपत नाही तापेपर्यंत अशा घटना रोखता येत नाहीत. येथील सामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. धार्मिक स्थळी फुलप्रूफ सुरक्षा उपलब्ध करून देण्यात यावी. सत्ताधारी पक्षाचे खासदार जय प्रकाश म्हणाले, जगभरात कट्टरवाद वाढू लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...