आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Military Repression In Balochistan; Kidnapping Of 8,000 People In 23 Years, Victims Of Atrocities In Pakistan Took To The Streets

बलुचिस्तानमध्ये लष्कराची दडपशाही:23 वर्षांत 8 हजार जणांचे अपहरण, पाकिस्तानात अत्याचारांमुळे त्रस्त जनता रस्त्यावर

इस्लामाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये सुरक्षा दलाकडून होणाऱ्या दडपशाहीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यावरून जनतेमध्ये असंतोष आहे. त्यातच बलूचचे विद्यार्थी नेते जाकीर माजिद बलोच बेपत्ता झाल्याच्या घटनेला बुधवारी १४ वर्षे पूर्ण झाली. माजिद यांच्याबद्दल काहीही सुगावा मिळाला नसल्याने बुधवारी क्वेटामध्ये प्रेस क्लबसमोर निदर्शने करण्यात आली. त्याचे नेतृत्व व्हाइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्सने (व्हीबीएमपी) केले. व्हीबीएमपीच्या म्हणण्यानुसार बलूचवर लष्कर व इतर सुरक्षा दलाचे अत्याचार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. लोकांना त्यांच्या नागरी हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. गेल्या २२-२३ वर्षांपासून ५ ते ८ हजारांवर लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्यांच्या यादीत बलूचमधील कार्यकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. बलूच राष्ट्रवादी कार्यकर्ते आपल्या नागरी हक्कांसाठी चीन-पाकिस्तानच्या आर्थिक प्रकल्पाला कडाडून विरोध करत आहेत. काही नोकऱ्यांच्या नावाखाली बलूच नागरिकांना संसाधनांपासून वंचित ठेवले जात आहे, अशी नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे. ते मोकळेपणाने फिरूही शकत नाहीत. ते सामान्यपणे कामकाजही करू शकत नाहीत.

विद्यार्थ्यांचे शोषण, दहशतीचे वातावरण
पाकिस्तानात नागरिक बेपत्ता होण्याची सुरुवात मुशर्रफ यांच्या कार्यकाळापासून म्हणजे (१९९९-२००८) झाली होती. मुशर्रफ यांच्यानंतरही बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच राहिले. बलूच विद्यार्थी देशात राहत असो की परदेशात, त्यांना नेहमी अपहरण, यातना, हत्या अशा दहशतीखाली राहण्याची वेळ आल्याचे बलूच संघटनेचे म्हणणे आहे.

बेपत्तांविषयी कोर्टही सुगावा मागू लागलेय
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने विद्यमान शाहबाज सरकारपासून माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्यापर्यंत सर्व माजी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत. नेमके किती लोक बेपत्ता आहेत याचा शोध घेण्यात यावा असे न्यायालयाने म्हटले आहे. नागरिकांचे अपहरण होत आहे. या प्रकरणात सरकार मूग गिळून बसले आहे.

आपबीती : मानवी हक्क कार्यकर्त्यास क्रूर वागणूक, १२ वर्षे कैद
बलूच प्रांतातील अपहरणांचा तपास करण्यासाठी पाकिस्तानला पोहोचलेले नॉर्वेचे मानवी हक्क कार्यकर्ते एहसान अर्जेमंडी यांनाही वाईट वागणूक देण्यात आली. अर्जेमंडी यांना बेकायदा पद्धतीने ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना क्रूर वागणूक देण्यात आली आहे. अर्जेमंडी म्हणाले, ३१ जुलै २००९ मध्ये येथे पोहोचलो. त्यानंतर त्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे मला तपास पूर्ण करता आला नाही, असे अर्जेमंडी यांनी सांगितले. ६ ऑगस्टला मांड ते कराचीला जाणाऱ्या बसमध्ये बसले होते. ७ ऑगस्टच्या सकाळी बलुचिस्तान व सिंधदरम्यान पाकिस्तान सुरक्षा दलांनी त्यांना बसमधून बाहेर फेकले.

बातम्या आणखी आहेत...