आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:भारतीयांचे लाखो ग्रीन कार्डचे अर्ज धूळ खात, अमेरिकन व्यवस्थेतील सुस्तावलेपणाचा फटका

न्यूयॉर्क / मोहंमद अली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन व्यवस्थेतील सुस्तावलेपणाचा फटका अमेरिकेत राहणाऱ्या लाखाे भारतीयांना साेसावा लागत आहे. त्यातून लाखाे ग्रीन कार्ड अर्ज केराच्या टाेपलीत गेले आहेत. काही वर्षांत अमेरिकेत १० लाखांहून जास्त ग्रीन कार्ड अर्जावर प्रक्रियादेखील हाेऊ शकलेली नाही, असे एका आकडेवारीवरून दिसून येते. त्यातून हे कर्मचारी काम करत असलेल्या कंपन्यांचीदेखील अडचण वाढली आहे. सद्य:स्थितीत ६ लाख ३२ हजार २१९ भारतीय स्थलांतरित व त्यांच्या कुटुंबांचे अर्ज प्रलंबित आहेत. या विलंबामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेतही संकट वाढले आहे. कारण भारतातील डाॅक्टर-परिचारिका, साॅफ्टवेअर इंजिनिअरसारख्या व्यावसायिकांना अमेरिकेत खूप मागणी आहे. वाॅशिंग्टन येथील कॅटाे इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ डेव्हिड जे. बिअर म्हणाले, सध्याचा ग्रीन कार्ड वितरणाचा वेग मंदावलेला आहे. असाच वेग राहिल्यास सर्व अर्जदार व्यावसायिकांना व्हिसा मिळायला १५१ वर्षांचा कालावधी लागू शकताे.

अमेरिकन इमिग्रेशन लाॅयर्स असाेसिएशनचे संचालक शेव दलाल धेइनी दैनिक भास्करला म्हणाले, अमेरिकन संसदेने प्रतिवर्ष ग्रीन कार्डच्या काैटुंबिक अर्जांची संख्या २२६००० निश्चित केली आहे. नाेकरी करणाऱ्यांची संख्या १४०००० एवढी आहे. हा आकडा पूर्ण झाला नाही तर उर्वरित पुढल्या वर्षी जाेडल्या जातात. २०२० मध्ये काेराेनामुळे नियाेजित संख्येत ग्रीन कार्ड अर्जाची प्रक्रिया हाेऊ शकली नव्हती. त्यामुळे २०२१ मध्ये नियाेजित संख्येत एक लाखाहून जास्त अर्ज हाेते. त्यांची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत हाेणे आवश्यक हाेते. बहुधा ते अर्ज कचरा कुंडीत टाकण्यात आले असावे.

अॅपल, गुगल, मायक्राेसाॅफ्टसारख्या कंपन्यांत माेठ्या संख्येने भारतीय स्थलांतरित अमेरिकेत राहून सेवा देतात. या कर्मचाऱ्यांच्या अर्जावर अद्याप कारवाई झाली नाही तर कंपन्यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम हाेऊ शकताे. व्यवस्थेने परदेशी वंशाच्या व्यावसायिकांना अधांतरी साेडले आहे, असे अॅपलचे सीईआे टिम कुक यांनी अध्यक्ष बायडेन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आजारी आई-वडिलांची भेटही कठीण झाली
कॅलिफाेर्नियामध्ये क्रिटिकल केअर डाॅक्टर श्रीराम चहल म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून ग्रीन कार्डची प्रतीक्षा करत आहे. ते म्हणाले, २०२० मध्ये काेराेना विषाणूशी संबंधित काळानंतर यंदा अतिरिक्त १,२२०० राेजगाराधारित ग्रीन कार्ड तयार करण्यात आले. किमान एक लाख ग्रीन कार्ड व्यर्थ गेले. आम्ही दहा वर्षांपासून आजारी असलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी भारतात गेलाे नाही. कारण भारतातून अमेरिकेत परतीसाठी पुन्हा परवानगी मिळेल की नाही, अशी भीती वाटे. त्यावरून चहल यांना या प्रश्नी निश्चितपणे काय हाेईल, हे सांगता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...