आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाची मदत बंद:मुलांचे पोट भरण्यासाठी लाखो आई-वडील उपाशी! ब्रिटनमध्ये ८ लाख घरांत जेवणाची थाळी रिकामी राहणे शक्य

लंडन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १२०० फूड बँकांचाही वाईट परिस्थितीशी सामना

ब्रिटनमध्ये आठ लाखांहून जास्त कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. कारण महामारीच्या काळात सुरू झालेल्या मदतीस सरकारने एक आॅक्टाेबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. साेबतच दर आठवड्याला कुटुंबांना दिले जाणारे २० पाैंड (सुमारे दाेन हजार रुपये) एवढी मदतही बंद केली जाणार आहे. त्यामुळेच गरीब व गरजू कुटुंबांना भाेजनाची भ्रांत पडणार आहे. काेराेनाकाळातील मदत बंद करणाऱ्या माेठ्या अर्थव्यवस्थांमध्ये ब्रिटनचा समावेश हाेताे. युनिव्हर्सल क्रेडिट सिस्टिम (यूसीएस) बंद झाल्याने भाेजनाच्या उपलब्धतेवर परिणाम हाेण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या सुमारे १२०० फूड बँकांनी आता वाईट परिस्थितीचा अंदाज बांधून त्याला ताेंड देण्याच्या तयारीस सुरुवात केली.काेराेनाकाळात चॅरिटी फूड बँकेने ब्रिटनच्या लाखाे गरजू कुटुंबांना पास्ता व बेबी फूड उपलब्ध करून दिले हाेते. ट्रुसल ट्रस्टचे संचालक गॅरी लेमन म्हणाले, आई-वडिलांवर उपाशी राहण्याची वेळही आेढवू शकते. कारण मुलांना जेवण देण्यास त्यांचे प्राधान्य राहील. परंतु उपासमारी टाळण्यासाठी फूड बँका कामाला लागल्या आहेत.

फूड बँकांचे पूर्ण क्षमतेने काम
स्काॅटलंडमधील एका फूड बँकेचे मायरी मॅकल्लम म्हणाले, फूड बँक पूर्ण क्षमतेने काम करत आहे. एका पाहणीनुसार प्रत्येकी पाचपैकी एका कुटुंबाला एकवेळचे भाेजन साेडावे लागेल. परिस्थिती वाईट हाेत चालली आहे. पूर्व लंडनच्या एका फूड बँकेने प्रत्येक कुटुंबाला बारा वेळा भाेजन देण्याची अट घातली आहे. त्यामुळे वंचितांनादेखील भाेजन मिळू शकेल.

युरोपात महागाईचेही चटके

स्पेन : महागाईचा दर गेल्या १३ वर्षांदरम्यान ४ टक्के उच्च पातळीवर राहिला. इंधनाच्या वाढत्या दरामुळे महागाईच्या दरात वाढ.
इटली : एका दशकाच्या काळात महागाईचा दर ३ टक्के एवढा सर्वाेच्च राहिला. विजेचे दर २०.५ टक्क्यांनी वाढले.
फ्रान्स : एका दशकाच्या काळात महागाई दर सर्वाधिक २.७ टक्क्यावर आहे. इंधन दरात सर्वाधिक वाढ झाली आहे.

सहा दिवसांपासून भोजन नाही

अँटी पॉव्हर्टी ग्रुपने अल्प उत्पन्न असलेल्या गटासाठी काेराेनानंतरची परिस्थिती कठीण ठरेल असा इशारा दिला आहे. प्रत्येक कुटुंबाला सरासरी १४ हजार रुपयांचे वीज बिल भरावे लागणार आहे. लंडनचे निवासी एमा म्हणाले, मुलांनी सहा दिवसांपर्यंत भाेजन केलेले नाही. फूड बँकेतून त्याची व्यवस्था करावी लागली. आर्थिक अडचण आणखी वाढू शकते.

रोनाल्डोच्या बँटलेसाठी ७ तासांनंतरही पेट्रोल नाही

ब्रिटनमध्ये पेट्रोल संकट कसे आहे हे सांगणारे छायाचित्र चर्चेत आहे. फुटबॉल स्टार रोनाल्डोच्या २.१९ कोटी रुपयांच्या बँटले कारला दोन कर्मचारी विल्मस्लो पंपावर पेट्रोल भरण्यासाठी घेऊन गेले, परंतु सात तास प्रतीक्षा केल्यानंतरही त्यांना पेट्रोलचा एक थेंबही मिळू शकला नाही. दोन्ही कर्मचारी रिकाम्या हाताने परतले.

बातम्या आणखी आहेत...