आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:तरुणांचा मोहभंग झाल्याने रस संपला; चीनमध्ये लाखो लोकांनी टाळला विवाह आणि अपत्यही

बीजिंग25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6 वर्षांत प्रमाण 40 टक्के घसरण; 2013 मध्ये 2.38 कोटींचा सरासरी विवाह, 2019 मध्ये 1.39 कोटी

चीनमध्ये २५ ते ४० वर्षे वयोगटातील लोक विवाह टाळू लागले आहेत. या वयोगटातील लोकांकडे चांगली नोकरी असून रोजगारात खूप व्यग्र झाले आहेत. ते चांगल्या कमाईसह नावलौकिकदेखील मिळवू लागले आहेत. असे असले तरी त्यांनी विवाहापासून दूर राहणेच पसंत केले आहे. त्यामुळे चीन सरकार त्रस्त झाले आहे. तेथे सहा वर्षांत या वर्गातील विवाहांची संख्या ४० टक्क्यांहून कमी झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्यूरोच्या आकडेवारीनुसार या वर्गात पहिल्यांदा विवाह करणारे लोक २०१३ मध्ये २.३८ कोटी होते. २०१९ पर्यंत या संख्येत घट होऊन ते १.३९ काेटीवर आले. प्रपंच सुरू करण्यावरून होत असलेल्या मोहभंगाबाबत चिनी अधिकारी आणि समाजशास्त्रज्ञांचे मत वेगळे आहे. या मोहभंगामागे चीनचे लोकसंख्या नियंत्रणविषयक धोरण हे सर्वात मोठे कारण आहे, असे त्यांना वाटते. या धोरणामुळेच विवाह करण्यात रस दाखवणाऱ्या तरुणांची संख्या कमी आहे. तरुणांसोबत तरुणींमध्येही अनिच्छा दिसते. तरुणींचा वर्ग विविध संस्थांमध्ये काम करणारा आहे. त्यांना नोकरी सुरू ठेवायची आहे. ३१ वर्षीय जॅआे मिली म्हणाल्या सोशल मीडियावर कौटुंबिक हिंसाचार, विवाहित महिलांच्या अपमानाच्या बातम्यांमुळे तरुण वर्गाची मानसिकता बदलली आहे. या वर्गातील महिला विवाह करणे हा सर्वात मोठा मूर्खपणा मानू लागल्या आहेत. विवाहानंतर हिंसाचाराची बळी ठरू, अशी अनामिक भीती त्यांच्या मनात असल्याचे दिसते. त्यामुळेच विवाह करणे हा त्यांच्यादृष्टीने प्राधान्याचा विषय नाही. बाल लैंगिक अत्याचार कायद्यात दुरुस्तीसाठी झालेल्या आंदोलनात २ हजार किमीच्या मार्चमध्ये मिली देखील सहभागी झाल्या होत्या. नागरी व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी यांग जोंगताआे यांनी एका संमेलनात संवाद साधला होता. त्यांच्या मते चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रण धोरणामुळे तरुणांत अपत्य जन्माला घालण्यापासून दूर राहण्याची मानसिकता झाली आहे. त्यातून गंभीर आर्थिक व सामाजिक अस्थैर्य येण्याची परवानगी आहे. विवाह व अपत्य या दोन्ही गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत. त्याचा जन्मदरावर देखील परिणाम होऊ शकतो.

२०१४ मध्ये चाकरमानी समुदायात घट झाल्याने गुंडाळले होते धोरण

चीनच्या लोकसंख्येसंबंधी मंत्रालयानुसार २०१९ मध्ये १ हजार लोकांपैकी सरासरी ६.६ लोकांनी विवाह केला. ही संख्या १४ वर्षांत सर्वात कमी राहिली. त्यामागे १९७९ मध्ये लागू एक अपत्य धोरणाचे कारण ठरले. २०१४ मध्ये तीन दशकांनंतर चाकरमानी समुदायातील लोकसंख्येचा संकोच होत गेला. त्यानंतर चीनने एक अपत्य धोरण गुंडाळले. १९९० ते २०१६ दरम्यान महिलांच्या पहिल्या विवाहाचे वय सरासरी २२ ते २५ राहिले. पुरुषांचे वय २४ ते २७ राहिले.