आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अजूनही लाखो विद्यार्थी शाळेपासून दूरच, समाजात मिसळत नसल्याने मुलांना शाळा नको वाटते

लंडन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमधील कोरोनाकाळातील लॉकडाऊनचा मोठा परिणाम शाळकरी मुलांवर झाल्याचे दिसते. ब्रिटनमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. सुमारे सव्वा लाखावर विद्यार्थी अजूनही शाळेपासून दूर आहेत किंवा अनियमित आहेत. अशा मुलांना ‘घोस्ट चाइल्ड’ संबोधले जात आहे. म्हणजे अशी मुले कधीतरी जातात किंवा शाळेत जाणेच टाळू लागले आहेत. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जेन ग्लीमर म्हणाले, अलीकडे अनेक पालक आपल्या मुलांना डॉक्टरांना दाखवण्यासाठी घेऊन येत असल्याचे दिसते. कोरोनाकाळात मुलांमध्ये एकाकीपणा वाढला. समाजातील भेटीगाठी आणि मिसळणे खूपच कमी झाले. अनेक मुलांमध्ये तर शाळेत जाणे आणि शिक्षणाची इच्छाच संपून गेली आहे. अशा मुलांना मनोचिकित्सेची गरज आहे, असे सेंटर फॉर सोशल जस्टिसने म्हटले आहे.

मानसतज्ज्ञ डॉ. बॅटिना हॉनिन म्हणाल्या, मुले शाळेत जाण्यासाठी संकोच करत असल्यास पालकांनी त्यांच्या परीने प्रयत्न करावा. त्यांना प्रोत्साहन द्यावे. पालकांनी मुलांसमवेत सतत संवाद ठेवायला हवा. त्यांना एकटे वाटायला नको. त्यांच्याशी खूप गप्पागोष्टी करा. शाळेत का जावे वाटत नाही, याचे कारण मुलांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करा. अभ्यासाविषयी अनिच्छा येत असल्यास त्याला समजावून सांगा. पौगंडावस्थेतील मुलांवर आपले आदेश थोपवू नका. त्या ऐवजी या वयोगटातील मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रेरित करा.

मुलांवर दबाव नको, शाळेचे महत्त्व सांगा
डॉ. ग्लीमर म्हणाले, शाळेत जाण्यावरून टाळाटाळ करणाऱ्या मुलांवर दबाव आणू नका. पालकांनी मुलांना शाळेचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या त्यांना समरस होण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...