आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-युक्रेन युद्ध:सव्वाचार कोटी युक्रेनी नागरिकांत विजयाची आशा, हल्ल्याच्या सायरनमुळे आता भीती वाटत नसल्‍याची भावना

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्ध १८ वा दिवस लाखो लाेक एका आशेने आमच्या देशात येत आहेत. सुरुवातीला त्यांना मदत कशी करावी हे कळाले नाही. नंतर आम्ही युक्रेनच्या नागरिकांसाठी हाॅटेल उपलब्ध करून दिली. युक्रेन सीमेपासून ३० किमीवरील लुबलिनमध्ये हाॅटेल चालवणाऱ्या मार्टा कोमेन म्हणाल्या, शेजाऱ्याला मदत करण्यासाठी हृदय आणि घरे खुली करावी लागतात. आम्हीदेखील हेच केले. युक्रेनमधून येणाऱ्या लाेकांना आम्ही हाॅटेलमध्ये माेफत राहण्याची व्यवस्था करून देत आहाेत. स्थलांतरितांच्या साेयीसाठी संपूर्ण शहरातील नागरिकांनी देणगी गाेळा करून आम्हाला दिली आहे.

रशियाने युक्रेनवरील हल्ल्यानंतर सुमारे २५ लाख नागरिकांनी देश साेडला. अजूनही देशात सव्वाचार कोटी नागरिक राहतात. युद्धाच्या सुरुवातीला हल्ल्याची सूचना देणारा सायरन वाजताच लाेक बंकरमध्ये दडून बसण्यासाठी धावत. परंतु आता सायरन दिवसभरात अनेक वेळा वाजताे, पण नागरिकांच्या चेहऱ्यावर भय दिसत नाही. हल्ला झाल्यावर बंकरमध्ये जातात, अन्यथा बाहेर राहतात. संपूर्ण बाजारपेठ खुली नसली तरी अनेक दुकाने खुली दिसतात. पेट्रोल पंप, एटीएम, आैषधी दुकाने खुली असल्याचे दिसते. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा केला आहे. रशियन सैन्याच्या घेरावानंतरही युक्रेनच्या नागरिकांत विजयाची आशा अजूनही बळकट असल्याचे दिसते. आमच्याकडे रशियापेक्षा चांगली ‘मेंटल डिफेन्स सिस्टिम’ आहे. रशिया युद्धात पराभूत हाेईल, असे नागरिकांना वाटते. विवाह तसेच इतर आयाेजन पूर्वीसारखेच सुरू आहे.

कीव्हची रहिवासी १४ वर्षीय वान्या आता पाेलंडमधील क्रोस्नाेतील एका घरात राहू लागली. परदेशात मला माझ्या घरात बहीण-भाऊ भेटले. कीव्ह साेडल्याचे दु:ख काहीसे हलके झाले. येथे मी आनंदी आहे.

स्थलांतरित नव्हे. घरावर शत्रूचा डोळा
पाेलंडच्या बिलगाेराज शहरातील सेबिस्टियन म्हणाले, युक्रेनमधून येणारे स्थलांतरित नाहीत. शत्रू त्यांच्या घरावर ताबा मिळवू पाहत आहेत. युक्रेनी मुले माझ्या मुलांसमान आहेत. परिस्थिती सुधारेपर्यंत ते घरात राहतील.

अमेरिकन पत्रकार ब्रेंट रेनाॅड यांचा मृत्यू झाला. त्यांचे सहकारी जखमी. मदतीसाठी हृदयाची आणि घराची दारे खुली करावी लागतात; पाेलंडच्या जनतेची भावना

(महिनाभर युद्धभूमीतून वार्तांकन करणारे वायटेक बाेहेक यांनी सांगितल्यानुसार) ब्रिटनचे संरक्षणमंत्री म्हणाले, रशिया आता पूर्व युक्रेनमध्ये हल्ले वाढवेल. रशियात युद्धविरोधी निदर्शनांत वाढ, आतापर्यंत १४ हजारांहून जास्त अटकेत. जॅपिरोजियावर रशियाचा हल्ला शक्य, युक्रेनचा आण्विक संस्थेला इशारा. रशियन बॉम्बहल्ल्यात कीव्ह साेडणाऱ्या सात युक्रेनींचा मृत्यू. मॅलिटाेपाेलमध्ये निर्वाचित महापाैरांच्या अपहरणानंतर रशियाने महापाैर नियुक्त केला. पाेलंडचे राष्ट्रपती आंद्रेज डुडा म्हणाले, पुतीन अडकले आहेत. केमिकल हल्ला शक्य.

बातम्या आणखी आहेत...