आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Mindfulness Is Also Good | Learn New Skills| Research From The Massachusetts Institute Of Technology Reveals.

अभ्यास:चित्त ढळणेही चांगले, यामुळे नवे कौशल्य शिकण्यास मिळते मदत, मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूटच्या संशोधनात उघड

वॉशिंग्टन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी-कधी काही काळासाठी आपले गोष्टीपासून लक्ष विचलित होते. याला आतापर्यंत योग्य मानले गेले नाही. मात्र, नुकतेच मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट अॉफ टेक्नॉलॉजीच्या(एमआयटी) एका अभ्यासात समोर आले की, काही काळ लक्ष विचलित होणेही चांगले असते. यामुळे आपल्या डोक्यात नवे कौशल्य शिकण्याची प्रक्रिया वेगवान होते. नवी माहिती ग्रहण करण्यात मदत मिळते.

न्यूरोसायंटिस्ट व प्रमुख संशोधक अॅलेक्झेंड्रा डेकर म्हणाल्या की, लक्ष दिल्याने आपले काम करण्यात जशी मदत मिळते तसेच काही काळ फोकस ढळल्यावर लक्ष देण्याची कक्षा रुंदावते. यामुळे अनेकदा अप्रासंगिक माहिती ग्रहण करण्यास मदत मिळते. याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करत असतो. मेंदू रिफ्रेश होतो. नवे विचार विकसित करण्यास मदत मिळते. आपला मेंदू दर ४ सेकंदाला फोकस बदलतो. मात्र, ही स्थिती तेव्हा बनते जेव्हा आपल्या मेंदूचा वापर जास्त झाल्यावर तो जड पडतो. मागील अभ्यासांत याकडे नकारात्मकता ठरवत दिवसा स्वप्न पाहण्याशी जोडले जात होते.

बातम्या आणखी आहेत...