आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकेत मिनी IPL:लीग 10 जानेवारीपासून; व्यवस्थापन, प्रसारण सर्व भारताच्याच जिवावर

केपटाऊनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
ललित मोदी यांचे निकटवर्तीय सुंदर रमण - Divya Marathi
ललित मोदी यांचे निकटवर्तीय सुंदर रमण

दक्षिण आफ्रिकेत १० जानेवारीपासून एसए २० ही नवी क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. पहिला हंगाम १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. ६ संघांमध्ये ३३ सामने होणार आहेत. या स्पर्धेत चाहत्यांना मिनी आयपीएलची झलक पाहायला मिळेल. स्पर्धेतील सर्व संघांचे मालकी हक्क मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादसह ६ आयपीएल फ्रँचायझींकडे आहेत. त्याशिवाय स्पर्धेचे यशही भारतीय व्यवस्थापन आणि प्रसारण कंपन्यांवर अवलंबून आहे. म्हणजेच सर्वकाही भारताच्याच जिवावर आहे.

एसए २० लीगचे डायरेक्टर आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ यांच्यानुसार, या लीगला आयपीएलनंतरची सर्वात मोठी स्पर्धा बनवण्याचा त्यांचा मानस आहे. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका या स्पर्धेसाठी रद्द केली. त्यावरून तिचे महत्त्व लक्षात येईल. ही मालिका वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग होती. तसेच विश्वचषकच पात्रतेसाठी महत्त्वाची होती.

ललित मोदी यांचे निकटवर्तीय सुंदर रमण करणार संचालन, २०% असेल भागीदारी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने याआधीही दोनदा टी २० स्पर्धा घेतली होती. मात्र सुमार व्यवस्थापनामुळे फारसा गाजावाजा झाला नाही. २०१७ मध्ये ग्लोबल लीगला प्रसारणकर्ता आणि प्रायोजक मिळाला नाही. मजान्सी सुपर लीग कोविडमुळे बंद करावी लागली. एसए २० यशस्वी करण्याची जबाबदारी आयपीएलचे सीईओ राहिलेल्या सुंदर रमण यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांची स्पर्धेत २०% भागीदारी आहे. ते ललित मोदी यांचे निकटवर्तीय आहेत.

बेटिंग अॅप टायटल स्पॉन्सर, तेथे सट्टेबाजी वैध : स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग कंपनी बेटवे आहे. दोघांनी मल्टी-इअर करार केला आहे. आफ्रिकेत सट्टेबाजी वैध आहे.

आयपीएल मालकांचीच या स्पर्धेतही संघ खरेदी
फ्रँचायझी संघ कर्णधार
मुंबई इंडियन्स केपटाऊन इंडियन्स राशिद खान
चेन्नई सुपर किंग्ज जोहान्सबर्ग सुपर किंग्ज फाफ डू प्लेसिस
राजस्थान रॉयल्स पार्ल रॉयल्स डेव्हिड मिलर
सनरायझर्स हैदराबाद सनरायझर्स ईस्टर्न केप अॅडन मार्करम
दिल्ली कॅपिटल्स प्रिटोरिया कॅपिटल्स वेन परनेल
लखनऊ सुपरजायंट्स डर्बन सुपरजायंट्स क्विंटन डिकॉक

खेळाडू तेच, जे आयपीएलमध्येही खेळतात...
आयपीएलमध्ये खेळणारे डझनावर खेळाडूच या स्पर्धेत खेळणार आहेत. डॅ्वेन प्रिटोरियस, क्लासेन, होल्डर, टॉप्ले, प्लेसिस, तिक्ष्णा, ब्रुक, फेरेरा, रबाडा, लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ओडियन स्मिथ, ब्रेविस, बटलर, मॅकॉय, नॉर्किया, रूसो, साल्ट, जोश लिटिल, आदिल रशीद, विल जॅक्स, मार्क्रम, यंसेन, स्टब्स ही काही नावे. मात्र बीसीसीआयने परवानगी न दिल्याने एकही भारतीय खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाही. सामने प्राइम टाइममध्ये, रिलायन्सकडे प्रसारणाची जबाबदारी : एसए२० लीगच्या प्रसारणाचे हक्क रिलायन्सच्या मालकीच्या वायकॉम-१८ ने खरेदी केले आहेत. १० वर्षांचा हा करार ८०० कोटीत झाला. सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ आणि ९ वाजता सुरू होणार आहेत.

फ्रेंचायजीचे कोच, जर्सी, लोगो आयपीएलसारखेच :
आयपीएलच्या बक्षिसाची रक्कम ४६.५ कोटी रुपये आहे. एसए २० लीगची ३३ कोटी आहे. फ्रेंचायजींनी संघाच्या समान ओळखीसाठी ग्लोबल कोचची नियुक्ती केली आहे. संघांचे लोगो, जर्सीही आयपीएलसारख्याच आहेत.

बातम्या आणखी आहेत...