आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठपका:ट्रम्प यांच्या निकटवर्तीय समर्थकांनी पसरवले कोरोना लसीबद्दल गैरसमज, लसीत मायक्राेचिप, बारकाेड?

न्यूयाॅर्क7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डाेनाल्ड ट्रम्प यांच्या लीगल टीमच्या सदस्य सिडनी पावेल यांनी गेल्या महिन्यात निवडणुकीत घाेटाळा झाल्याची थिअरी पसरवण्याचा प्रयत्न केला हाेता. हे षड‌्यंत्र आहे. काॅन्स्पिरन्सी थिअरीला बळकट आधार नसताे. म्हणूनच ट्रम्प यांनी निवडणुकीत माेठा विजय संपादन केल्याचा दावा त्या सातत्याने अनेक दिवस करत राहिल्या. परंतु त्यांचे सर्व दावे खाेटे ठरले. आता सिडनी पाॅवेल यांच्यावरही काेराेना लसीबाबत गैरसमज पसरवण्याचा ठपका ठेवला जात आहे.

पाॅवेल यांनी केलेली मांडणी अशी हाेती - अमेरिकेतील जनता दाेन भागांत वाटली जाईल. एका गटाचे लसीकरण झालेले असेल. दुसऱ्या गटाचे लसीकरण नसेल. लसीकरण नसलेल्या लाेकांवर आगामी सरकार निगराणी ठेवण्याचे काम करेल. त्यांना ट्रॅक केले जाईल. असे हाेता कामा नये. आगामी सरकार कम्युनिस्टांच्या अधिपत्याखालील असेल. त्यांचे विचार चीनमधून आयात केलेले असतात. पाॅवेल यांनी हा संदेश ट्रम्प व माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारास टॅग केला आहे. या संदेशाला २२,६०० वेळा शेअर करण्यात आले. ५१ हजारांहून जास्त वेळा लाइक करण्यात आले. अशा प्रकारची माहिती प्रसृत करण्याचे आराेप केवळ पाॅवेल यांच्यावर लागलेले नाहीत तर मार्जाेरी टेलर ग्रीन यांच्यावरही तसा आराेप आहे. तेही ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांपैकी आहेत. ग्रीन रिपब्लिकन आहेत. त्याशिवाय काही ट्रम्प समर्थक संकेतस्थळेही लसीच्या विराेधात वातावरण तयार करत आहेत. या लाेकांना लसविराेधी कार्यकर्ता राॅबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांचीही साथ मिळाली आहे. ते सर्व फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर माेहीम चालवत आहेत.

लसीत मायक्राेचिप, बारकाेड?
अमेरिकेत अलीकडे लसीबाबत अपप्रचार केला जात आहे. त्यासाठी नवनवीन दावेही केले जात आहेत. लसीच्या आडून शरीरात मायक्राेचिप व बारकाेड टाकले जात आहेत. त्यामुळे माणसाचे नेहमीसाठी ट्रॅकिंग केले जाऊ शकेल. लसीमुळे लाेकांचे आराेग्य बिघडू शकते, अशी अफवाही पसरवली जात आहे. लसीचे समर्थन करणारे मायक्राेसाॅफ्टचे बिल गेट्स यांना लक्ष्य केले जात आहे. काेराेनाच्या संसर्गासाठी ते जबाबदार आहेत. त्यांनी लसीच्या माध्यमातून अब्जावधींचा लाभ मिळवल्याचे आराेप केले जात आहेत. दुसरीकडे चुकीच्या माहितीचा पर्दाफाश करणाऱ्या कन्सल्टन्सी फर्म कार्ड स्ट्रॅटेजीजच्या सीईआे मेलिसा रेयान म्हणाल्या, खाेटे बाेलणारे एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उड्या मारतात. आपल्यावर लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा उद्देश असताे. त्यांना आपला प्रभाव कमी हाेऊ द्यायचा नसताे.

बातम्या आणखी आहेत...