आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-युक्रेन युद्ध:धान्य निर्यात करारानंतर 12 तासांनी ओडेसा बंदरावर रशियाने क्षेपणास्त्र डागले

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 5 महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. यात युक्रेनियन शहरे उध्वस्त झाली आहेत. देशातील पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. युद्धामुळे जगावर अन्न संकट निर्माण झाले. या संकटातून जगाला बाहेर काढण्यासाठी रशिया-युक्रेनने 23 जुलै रोजी धान्य निर्यात करारावर स्वाक्षरी केली. परंतु करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर 12 तासांनंतर रशियन सैन्याने ओडेसा येथील बंदरावर हल्ला केला.

करारानुसार रशियन सैन्य युक्रेनच्या बंदरांवर हल्ला करणार नाही, असे ठरले होते. असे असतानाही रशियाने ओडेसा बंदरावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. युक्रेन हा जगातील सर्वात मोठा गव्हाचा निर्यातदार देश आहे. गव्हा व्यतिरिक्त, युक्रेन धान्य, तेल आणि बियाणे देखील निर्यात करतो. ओडेसा बंदर शहरातून मालवाहतूक केली जाते.

रशियावर विश्वास ठेवता येणार नाही
युद्धानंतर, रशियाने काळ्या समुद्रावरील बंदर शहरे रोखली होती. धान्य निर्यात करारानंतर काळ्या समुद्रातून धान्याची निर्यात पुन्हा सुरू झाली. धान्य भरले जात असतानाच क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी याला रशियाचा रानटीपणा म्हटले आहे. ते म्हणाले की, रशियावर विश्वास ठेवता येणार नाही. रशिया दिलेली आश्वासने पाळली नाहीत याचा हा पुरावा आहे.

करारात काय नमूद होते
युक्रेनच्या बंदरांवर हल्ला न करण्याबरोबरच तुर्की आणि संयुक्त राष्ट्रे जहाजांची तपासणी करतील असेही ठरले. यामुळे रशियन शस्त्रे युक्रेनमध्ये आणली जाणार नाहीत याची खात्री होईल. त्याच वेळी, काळ्या समुद्रात अडकलेली धान्यांनी भरलेली जहाजे निर्यातीसाठी तात्काळ काढली जातील.

कराराची प्रमुख वैशिष्ट्ये

  • काळ्या समुद्रात अडकलेली धान्याने भरलेली जहाजे आता निर्यातीसाठी निघू शकणार आहेत.
  • रशियन सैन्य युक्रेनच्या बंदरांवर हल्ला करणार नाही.
  • रशियन शस्त्रे युक्रेनमध्ये आणली जाणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी तुर्की आणि संयुक्त राष्ट्र जहाजांची तपासणी करतील.
  • रशियन धान्य आणि खते काळ्या समुद्रातून निर्यात करण्यास सक्षम असतील.

बातम्या आणखी आहेत...