आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Mixed Clothing Trend In America Boys Dress Girls, Many Famous Brands Also In The Market, Change In People's Mindset

अमेरिकेत संमिश्र कपड्यांचा कल:मुले करतात मुलींचा पेहराव, अनेक नावाजलेले ब्रँडही बाजारात, लोकांच्या विचारसरणीतही बदल

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत सध्या संमिश्र कपड्यांचा कल आहेे. मुले असा पेहराव करतात जाे आतापर्यंत मुलींसाठी मानला जात होता. फ्यूजन किंवा जेंडर न्यूट्रल फॅशनच्या नावाखाली फॅशन शोमध्ये ते अधूनमधून दिसत होते. पण आता नव्या पिढीतील तरुणांचा असा विश्वास आहे की कपड्यांना लिंग नसते. त्यामुळे आता युनिसेक्स कपडे बाजारात सहज विकले जातात. व्हिक्टोरिया सिक्रेट, लुई व्हिटॉन आणि टॉमी हिलफिगर यांनी युनिसेक्स कपड्यांचे विविध प्रकार बाजारात आणले आहेत. बर्बेरी, माशिनाे, सेंट लाॅरेंट, व्हर्सेस सारख्या ब्रँडनेदेखील संमिश्र लेस शर्ट‌्स लाँच केले. कापड तज्ज्ञ मायकेल मेजर यांच्या मते, महिलांची अंतर्वस्त्रे लेस फॅब्रिकपासून बनवत. आता पुरुषांचे पोशाखही त्यापासून तयार हाेतात. १६ व्या शतकात युरोपमध्ये रेशीम धाग्यांचे मिश्रण करून लेस फॅब्रिक तयार झाले. २०० वर्षांपासून महिलांची अंतर्वस्त्रे त्यापासून बनतात. ते पुरुषांसाठी निषिद्ध हाेते. पण लंडनच्या अल्बर्ट म्युझियमचे वरिष्ठ फॅशन क्युरेटर क्लेअर विलकॉक्स म्हणतात, लेस फॅब्रिक्सने पुरुषांच्या पोशाखांची नवी ओळख निर्माण केली. मऊ कपड्यांचा वापर हे पुरुषांची विचारसरणी बदलत असल्याचे द्याेतक आहे.

जगभरात लिंगविरहित फॅशन मोहीम, अमेरिका आणि युरोप आघाडीवर {कोरिओग्राफर जैनील मेहता अनेकदा डान्स व्हिडिओंमध्ये स्कर्ट किंवा घागरा पेहरावात दिसतात. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर १.७ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यात जनील गुलाबी रंगाच्या घागरात गंगुबाई काठियावाडीच्या झूम रे गोरी या गाण्यावर नाचताना दिसतात.

{ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि मेगन त्यांच्या मुलांचे संगोपन लिंग-तटस्थ दृष्टिकोनाने करत आहेत. यामध्ये त्यांनी मुलींसाठी गुलाबी आणि मुलांसाठी निळा न निवडता सर्वांसाठी एकच रंग निवडल्याचे दिसत आहे.

{केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील एका शाळेने इयत्ता ११ वीच्या मुला-मुलींसाठी समान ड्रेस कोड लागू केला आहे. शाळेची ६० मुले आणि २०० मुली आता निळी पँट आणि पांढरा शर्ट घालून शाळेत येतात.

{६३ वर्षीय मार्क रोझ स्कर्ट आणि हाय हिल्स परिधान करून कार्यालयात जातात. ते सामान्य आणि विवाहितही आहेत. जर्मनीचा मार्क हा रोबोटिक्स इंजिनिअरही गेल्या अनेक वर्षांपासून असाच पेहराव करत आहे.

बातम्या आणखी आहेत...