आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानावर चिंता:मोबाइल फोनचा शोध लावणाऱ्या मार्टिन कूपर यांचा डेटा लिक; मोबाइल व्यसनाच्या मुद्द्यावर चिंतित

बार्सिलाेनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जवळपास ५० वर्षांपूर्वी व्यावसायिक मोबाइल फोनचा शोध लावणारे मार्टीन कूपरही(९४) सध्या इतरांप्रमाणे मोबाइल फोनबाबत चिंतित आहेत. खासगीपणात घुसखोरी, वैयक्तिक डेटा लिक होण्यासोबत इंटरनेटचे व्यसन आणि मुलांपर्यंत पोर्नसारखी सामग्री पोहोचण्याच्या मुद्द्यांनी त्यांनाही त्रस्त केले आहे. त्यांनी जेव्हा याचे संशोधन केले होते तेव्हा त्यांच्या डोक्यात हा विचार आला होता की, विटेसारख्या मोठ्या आकाराचा आणि लांब अँटिन्याचे हे उपकरण काम करेल का? आज ते अन्य लोकांप्रमाणे समाजातील याच्या परिणामाबाबत गोंधळे आहेत.

बार्सिलाेनामध्ये जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी एका मीडियाच्या मुलाखतीत सांगितले की, मोबाइलबाबत माझे सर्वाात वाईट मत आहे की, आता आमचे कोणते वैयक्तिक आयुष्य नाही. आपल्याबाबत सर्व कुठे ना कुठे रेकॉर्ड होत आहे आणि व्यक्तीला ज्यात रस आहे तिथपर्यंत त्याची पोहोच झाली आहे. खासगी डेटा लिक प्रकरणात कूपर म्हणाले, हा मुद्दा निकाली निघेल. मात्र, तो सोपा नाही. खूप साऱ्या लोक तुमच्यावरील निगराणी योग्य ठरवू शकतात. मुलांची इंटरनेटपर्यंत पोहोच आणि व्यवसानाबाबत कूपर यांना वाटते की, वेगवेगळ्या वर्गांसाठी वेगवेगळे इंटरनेट विकसित केले जावे. पाच वर्षे जो इंटरनेटचा वापर करेल,तो त्याला अभ्यासात मदत करेल. यात पोर्नसारखी सामग्री नसेल.

२.५ पाउंडच्या प्रोटोटाइपने कॉल केल्यानंतर घडली क्रांती कूपर यांनी ३ एप्रिल १९७३ रोजी न्यूयॉर्क सिटीत मोबाइलच्या प्रोटोटाइपने कॉल केला होता. मोटोरोलामध्ये त्यांच्या टिमने ५ महिन्यांपूर्वी पहिले प्रोटोटाइप डिझाइन केले होते. प्रोटोटाइप २.५ पाउंडचा आणि ११ इंची म्हणजे १ फुटापेक्षा थोडा कमी होता. हे काम करेल की नाही,असे तेव्हा वाटले होते. या कॉलने क्रांती झाली.

बातम्या आणखी आहेत...