आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी लष्कर भरती:गणिताच्या ऑनलाइन परीक्षेत कॉपी, 70पेक्षा जास्त जणांना पकडले, चूक मान्य केल्याने 55 नैतिकता शिकतील

न्यूयॉर्क24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूएस मिलिटरी अकादमीच्या परीक्षेत 44 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे उघड

न्यूयॉर्कपासून १०० किमी लांब वेस्ट पाॅइंट येथील यूएस मिलिटरी अकादमीच्या ४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भरती परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी केल्याचे समोर आले आहे. ७० पेक्षा जास्त परीक्षार्थींनी गणिताच्या परीक्षेत कॉपी केली. कोरोनामुळे मे महिन्यात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. निवड झाल्यानंतर अकादमीत जेव्हा हे परीक्षार्थी परीक्षकांसमोर आले तेव्हा कॉपीचा खुलासा झाला. ५९ जणांनी कॉपी केल्याचे मान्य केले. यातील ८ जणांविरोधात ‘आॅनर काेड’ सुनावणी घेण्यात येईल. यात पुराव्यांच्या आधारे त्यांना काढूनही टाकले जाऊ शकते. तर ५५ जणांना नैतिकतेचा धडा शिकवण्यासाठी पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले. अकादमीचे अधीक्षक लेफ्टनंट जनरल डेरिल ए विल्यम्स त्यांची शिक्षा ठरवतील.

अमेरिकी लष्कराचे सार्वजनिक व्यवहार संचालक ले. कर्नल क्रिस्टोफर ओफाट यांनी सांगितले की, मेमध्ये परीक्षेनंतर ऑनलाइन पेपर जोडण्यात गडबड दिसली. निवडलेल्यांना जूनमध्ये अकादमीत बोलावण्यात आले व परीक्षकांसमोर चौकशी करण्यात आली. तेव्हा ७० पेक्षा जास्त जणांनी कॉपी केल्याचे समजले. कॉपी केल्याचे मान्य करणाऱ्यांना अकादमीत पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलेे. येथे अकादमीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पाठवण्यात येते व त्यांना चूक सुधारण्याची संधी दिली जाते. त्याला ‘विलफुल अॅडमिशन प्राेग्राम’ नाव देण्यात आले आहे. यात आॅनर कोडअंतर्गत उमेदवारांना व्यावसायिक नैतिकता व मिलिटरी व्यावसायिकता शिकवली जाते. ‘आॅनर काेड’चा अर्थ आहे, खोटे न बोलणे, कॉपी व चोरी न करणे व सर्वात महत्त्वाचे - असे करणाऱ्यांचे समर्थन न करणे. दरम्यान, सशस्त्र सैन्यदल कर्मचाऱ्यांच्या उपसमितीच्या प्रमुख जॅकी स्पिअर यांनी घटना खेदजनक असल्याचे सांगत माफी मागितली आहे. आपली योग्यता व प्रामाणिकपणा दाखवत असल्याने लष्करी अधिकाऱ्यांना मान व सन्मान दिला जातो. विद्यार्थ्यांकडून हीच अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.

पहिल्यांदा १९७६मध्ये काॅपीच्या आरोपात १५० जणांना काढून टाकले होते
अमेरिकी लष्कराच्या भरती परीक्षेतील कॉपीची ही पहिली घटना नाही. याआधी १९७६ मध्ये कॉपी प्रकरण समोर आले होते. तेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम परीक्षेत १५० जणांना कॉपीच्या आरोपामुळे काढून टाकण्यात आले होते. यानंतर भरती परीक्षा चांगली आणि व्यवस्थित पद्धतीने घेण्यासाठी नवे नियम करण्यात आले. तत्कालीन लेफ्टनंट जनरल अँड्र्यू गुडपास्टर यांनी पॉइंट अकादमी प्रोग्राम, मिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम आणि कॅडेट ऑनर कोडमध्ये बदल केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser