आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्क:94.5 टक्के परिणामकारक काेराेना लस बनवल्याचा ‘माॅडर्ना’चा दावा, लस खाेलीतल्या साधारण वातावरणातही 12 तास सुरक्षित राहील

न्यूयॉर्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशियाच्या स्पुतनिकव्हीची चाचणीही भारतात सुरू

काेराेनाच्या लस उत्पादनाच्या संदर्भात साेमवारी आणखी एक चांगली बातमी आली. माॅडर्ना या अमेरिकेतील आैषध उत्पादक कंपनीने ते विकसित करत असलेली काेराेना लस तिसऱ्या आणि शेवटच्या चाचणीमध्ये ९४.५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला. माॅडर्ना कंपनी अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थच्या मदतीने ही लस विकसित करत आहे. या लसीची ३० हजार लाेकांवर चाचणी घेण्यात येत आहे. माॅडर्नाच्या लसीच्या परिणामांबद्दल संशाेधकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

अमेरिकेतील कोरोना नियंत्रण विभागाचे अधिकारी अँटनी एस. फाॅसी यांच्या मते, अशा परिणामांची आम्हाला अपेक्षा नव्हती. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा प्रारंभीचा अंदाज अधिकृतपणे जाहीर करणारी माॅडर्ना ही जगातील तिसरी कंपनी आहे. फायझरने गेल्या आठवड्यात त्याची लस ९० टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध हाेत असल्याचे म्हटले हाेते. दाेन्ही कंपन्या वर्षअखेरपर्यंत अमेरिकेत काेराेना लस आणण्याची तयारी करत आहेत.

भारतच्या काेव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी
इंडियन काैन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या मदतीने काेराेना लसीचे उत्पादन करत असलेल्या भारत बायाेटेकने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू केली आहे. कंपनीचे सीईओ कृष्णा एल्ला म्हणाले, तिसऱ्या टप्प्यात २६ हजार लाेकांवर लसीची चाचणी घेण्यात आली. या शिवाय आम्ही असे देशी आैषध तयार करत हाेताे, जे रुग्णांना नाकात थेंब टाकून दिले जाईल. या आैषधाचे पुढील वर्षी उत्पादन होईल.

रशियाच्या स्पुतनिकव्हीची चाचणीही भारतात सुरू
रशिया विकसित करीत असलेल्या स्पुतनिकव्ही काेराेना लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे. कानपूरच्या गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल काॅलेजच्या देखरेखीखाली ही चाचणी हाेत आहे. भारतात या लसीची तिसरी चाचणी हाेत आहे. रशियामध्ये स्थानिक वापराासाठी या लसीचे आॅगस्टमध्ये उत्पादन सुरू झाले. परंतु जगात त्याला अधिकृत मान्यता मिळालेली नाही तसेच या लसीच्तया चाचणीचे नमुने सार्वजनिक केलेले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...