आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Moderna Coronavirus Vaccine Trial Result Latest Updates | Moderna Covid Vaccine Is Safe And Effective For Children

दिलासा:मॉडर्नाचा दावा - आमची व्हॅक्सीन 12 ते 17 वर्षांच्या मुलांवरही 100% प्रभावी, US मध्ये मंजूरीसाठी अर्ज करणार

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वात पहिले फायजरला मिळाली मंजूरी

मॉडर्नाने आपल्या लसीचे मुलांवर झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायलच्या निकालांची घोषणा केली आहे. कंपनीने मंगळवारी निवेदन जारी करुन सांगितले की, त्यांची व्हॅक्सीन मुलांवर 100% प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. ही ट्रायल 12 ते 17 वर्षांच्या मुलांवर करण्यात आली होती.

ट्रायलमध्ये 12 ते 17 वर्षांच्या 3,732 मुलांचा समावेश करण्यात आला. यामध्ये 2,488 मुलांना दोन डोस देण्यास आले. ज्या मुलांना व्हॅक्सीनचे दोन्हीही डोस देण्यात आले होते, त्यांच्यात कोरोनाचे लक्षणे समोर आले नाहीत. परीणाम आल्यानंतर मॉडर्नाने म्हटले की, ते आपल्या लसीला मुलांसाठी मंजूरी देण्यासाठी अमेरिकेच्या रेग्युलेटर बॉडी FDA जवळ जूनमध्ये अर्ज करतील.

मुलांसाठी अमेरिकेत दुसरी व्हॅक्सीन असेल
जर मॉडर्नाला मंजूरी मिळाली तर ही अमेरिकेमध्ये किशोरवयीन मुलांसाठी दुसरी व्हॅक्सीन असेल. फेडरल रेग्युलेटर्सने याच महिन्यात 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी फायजर-बायोएनटेकच्या लसीला मंजूरी दिली आहे. फायजरच्या लसीला सुरुवातीला 16 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. तर मॉडर्नाची लस 18 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाऊ शकते.

न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई हॉस्पिटलचे व्हॅक्सीन एक्सपर्ट क्रिस्टिन ओलिवर यांच्यानुसार मॉडर्नाचे परीणाम खूप आशा जागृत करणारे आहेत. किशोरवयीन मुलांचा कोविडपासून बचाव करण्यासाठी जेवढ्या जास्त व्हॅक्सीन असतील तेवढे चांगले राहिल.

सर्वात पहिले फायजरला मिळाली मंजूरी
मुलांसाठी मंजूरी मिळवणारी जगातील पहिली कोरोना व्हॅक्सीन फायजर होती. कनाडाचे ड्रग रेग्यूलेटर हेल्थ कनाडाने 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी ही व्हॅक्सीन देण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी ही व्हॅक्सीन 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्यात आली होती. यानंतर अमेरिकेमध्येही याला परवानगी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...