आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी अमेरिकेत भेटीगाठी सुरू केल्या. भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतली. शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होईल. अमेरिका-भारत बिझनेस कौन्सिलच्या प्रमुख निशा देसाई बिस्वाल यांनी दैनिक भास्करला सांगितले की ही बैठक भारत, ऑस्ट्रेलिया व जपानशी सहकार्यावर केंद्रित असेल. भारत - प्रशांत क्षेत्रात व्यापारवृद्धीवरही चर्चा होईल. यात दोन्ही देशांत आर्थिक व व्यापारिक संधी वाढण्याची आशा आहे. मुक्त व्यापार वा मर्यादित व्यापारी करार होण्याचीही शक्यता आहे.
परकीय व्यापार तज्ज्ञ आर.के. मारू यांच्यानुसार, भारत-अमेरिकेत मुक्त व्यापार करार झाल्यास निर्धारित वस्तूंच्या आयात-निर्यात शुल्कातून मुक्ती मिळू शकते. यामुळे भविष्यात दोन्ही देशांत व्यापार वाढेल. सध्या दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापार भारताच्या बाजूने आहे. म्हणजे भारत अमेरिकेला आयातीपेक्षा निर्यात करतो. मुक्त व्यापार करारामुळे अमेरिका हा असमतोल कमी करण्याचा प्रयत्न करेल.
५ सीईओंशी चर्चा... भारतात गुंतवणुकीस दिग्गज कंपन्या इच्छुक, लष्करी ड्रोनचा करारही शक्य
मोदींनी गुरुवारी ३ दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात ५ कंपन्यांच्या सीईओंशी भेट घेऊन केली. सर्वांशी १५-१५ मिनिटे चर्चा झाली. या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. सर्वात महत्त्वाची भेट जनरल अॅटॉमिक्स कंपनीचे सीईओ विवेक लाल यांची ठरली. ही अत्याधुनिक लष्करी ड्रोन बनवणारी जगातील अव्वल कंपनी आहे. अमेरिकेने आतापर्यंत फक्त सहकारी देशांनाच हे ड्रोन दिले आहेत. बैठकीची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनुसार, मोदी सरकार अत्याधुनिक लष्करी ड्रोनमध्ये विस्तार आणि व्यापारी करारांवर भर देऊ शकते. बैठकीनंतर विवेक लाल यांनीही सांगितले की, तंत्रज्ञान आणि भारतात होत असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर चर्चा झाली. ही चर्चा भारतात गुंतवणुकीसाठी प्रेरित करेल.
आज विशेष...
भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री ८.३० वाजता मोदी व्हाइट हाऊसमध्ये असतील. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत अोव्हल ऑफिसमध्ये १ तास बैठक होईल. भोजनानंतर रात्री ११.३० वाजता क्वाड बैठकीत सहभागी होतील. ती २ तास चालेल. नंतर मोदी न्यूयॉर्कला जातील. शनिवारी त्यांचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.