आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने भारताला दिली खास भेट:बायडेन यांनी मोदींना सोपवल्या 157 कलाकृती आणि पुरावशेष; हे दुसरे ते 18 वे शतक प्राचिन

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायडेन यांनी मोदींना 157 कलाकृती आणि पुरावशेष दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 दिवसांचा दौरा पूर्ण करत शनिवारी उशीरा जॉन एफ. कॅनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला निघाले. पंतप्रधान रवाना होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी त्यांना विशेष भेट दिली. बायडेन यांनी मोदींना 157 कलाकृती आणि पुरावशेष दिले. हे दुसरे शतक ते 18 व्या शतक प्राचिन आहे.

या कलाकृतींच्या परत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आणि बायडेन यांचे आभार मानले. मोदी म्हणाले की, कलाकृती आणि पुरातन वास्तू कोणत्याही देशाचा अमूल्य ठेवा आहे. हे सुरक्षित आणि संरक्षित ठेवून आपल्या सांस्कृतिक वारस्याची सुरक्षा आहे. भारत आणि अमेरिका सांस्कृतिक वारसांची चोरी, बेकायदेशीर व्यापार आणि तस्करांचा सामना करण्यासाठी प्रयोग आणि मजबूतीसाठी प्रतिबध्द आहे.

या 157 कलाकृतिया आणि पुरावशेषमध्ये 10 व्या शतकाच्या बलुआ दगडापासून तयार केलेली दीड मीटरच्या नक्काशीपासून 12 व्या शतकाच्या उत्कृष्ट कांसेची 8.5 सेंटीमीटर उंच नटराज यांच्या मूर्तीचा देखील समावेश आहे.

पंतप्रधान कार्यालय (PMO) नुसार, यामध्ये जास्तीत जास्त वस्तू 11 व्या शतकापासून 14 व्या शतकाच्या आहेत. हे सर्व ऐतिहासिक आहे. यामध्ये मानवरुपी तांब्याच्या 2000 ईसा पूर्वी वस्तु तसेच दुसऱ्या शतकातील टॅराकोटाच्या फुलदाणीचा समावेश आहे.

सुमारे 71 प्राचीन कलाकृती सांस्कृतिक आहेत, तर उर्वरित लहान मूर्ति आहेत ज्या हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित आहेत. हे सर्व धातू, दगड आणि टॅराकोटपासून बनलेले आहे. कांस्यच्या वस्तूंमध्ये लक्ष्मी नारायण, बुद्ध, विष्णु, शिव-पार्वती आणि 24 जैन तीर्थंकरच्या वस्तूंचाही समावेश आहे. अनेक इतर कलाकृतींचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये कनकलामूर्ति, ब्राह्मी आणि नंदीकेसाचा समावेश आहे.

पीएमओने सांगितले की, हा देशातील प्राचिन कलाकृती आणि पोराणिक वस्तूंना जगातील विविध भागांमधून भारतात परत आणण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा भाग आहे.

बातम्या आणखी आहेत...