आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समरकंद बैठक:एससीओ परिषदेत मोदी-शाहबाज एकमेकांची भेट घेण्याची शक्यता

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उझबेकिस्तानातील समरकंदमध्ये शांघाय सहकारी संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पीएम शाहबाद शरीफ यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. राजकीय सूत्रांनुसार एका पाकिस्तानी माध्यमाचे म्हणणे आहे की, एससीओ शिखर परिषद १५-१६ सप्टेंबरला होणार आहे. यात संघटनेचे नेते प्रादेशिक आव्हानांवर चर्चेसाठी एकाचवेळी बैठक घेतील. चीन, रशिया, इराणच्या राष्ट्रपतींसह शाहबाज मोदींचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

परराष्ट्रमंत्र्यांनी बैठकीस सहमती दर्शवली होती
उल्लेखनीय म्हणजे २८ जुलैला एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांची एक बैठक झाली होती. यात संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या देशांच्या प्रमुख नेत्यांनाही शिखर परिषदेत भाग घेण्याबबात सहमती दर्शवली होती.

बातम्या आणखी आहेत...