आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Narendra Modi Speech India Global Week Update : Modi To Address India Global Week 2020 Starting In UK Today, Prince Charles Along With British Minister

इंडिया ग्लोबल वीक 2020 आजपासून:मोदी म्हणाले - इतिहास सांगतो की, भारताने प्रत्येक आव्हानाचा सामना केला, एकीकडे कोरोनाशी लढा देतोय दुसरीकडे अर्थव्यवस्था सांभाळली

नवी दिल्ली / लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजपासून यूकेमध्ये इंडिया ग्लोबल वीक 2020 ची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले - इतिहास दर्शवितो की प्रत्येक आव्हान जिंकले आहे. त्याचा पूर्णपणे सामना केला आहे. एकीकडे देश कोरोनाविरूद्ध लढा देत आहे आणि दुसरीकडे देश अर्थव्यवस्था सांभाळण्यातही यशस्वी झाला आहे. मोदींनी आणखीही अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. इंडिया ग्लोबल वीक तीन दिवस चालणार आहे.

भारत टॅलेंटचे पॉवरहाऊस
मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, 'भारत टॅलेंटचे पावरहाउस आहे भारताने जगाच्या विकास आणि कल्याणात योगदान दिले आणि आणि देण्याची इच्छाही आहे. आपल्या देशाला पुढे जाण्याची इच्छा आहे. भारतीय हे नॅचरल रिफॉर्मर आहेत. देश प्रत्येक आव्हानाचा सामना करते. मग ते सामाजिक असो की आर्थिक. आज देश संपूर्ण सामर्थ्याने कोरोनाविरूद्ध लढा देत आहे. परंतु, विकास आणि पर्यावरण संरक्षण हे एकाच वेळी व्हावे असे देशाला वाटते.'

ईज ऑफ टूइंग बिझनेसवर फोकस 

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'भारतात पृथ्वीला आई म्हणतात, आम्ही त्याची मुले आहोत. आम्ही इझ ऑफ डूइंग बिझिनेसवर काम करत आहोत. यासंदर्भात सर्व सुधारणा केल्या आहेत आणि त्या पुढे नेत आहोत. साथीच्या काळात देशातील लोकांना सुविधा पुरविण्यात आल्या. एक मदत पॅकेज जाहीर केले. एक-एक पैसा गरजूंपर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा आहे. पतंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही हे शक्य झाले. आम्ही कोट्यवधी लोकांना रोजगारही देत ​​आहोत. यामुळे ग्रामीण भागास मदत होईल. "

शिखर परिषद तीन दिवस चालणार 

इंडिया ग्लोबल वीक समिट 2020 तीन दिवस चालणार आहे. ही शिखर परिषद व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आयोजित केली जात आहे. मोदी सरकारचे अनेक मंत्री यात सहभागी होतील. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, रेल्वे व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी, आयटी मंत्री रविशंकर प्रसाद आणि कौशल्य विकास मंत्री महेंद्र नाथ पांडे ग्लोबल वीकमध्ये सहभागी झाले आहेत.

प्रिन्स चार्ल्सही यात सामील होतील

ब्रिटिश रॉयल फॅमिलीचे प्रिन्स चार्ल्सही या शिखर परिषदेत सहभागी होतील. याशिवाय परराष्ट्रमंत्री डोमिनिक रॉब, गृहमंत्री प्रीती पटेल, आरोग्यमंत्री मॅट हेनकॉक आणि ट्रेड मिनिस्टर लिझ ट्रस हेही या शिखर परिषदेत सहभागी होतील. भारत-ब्रिटन व्यावसायिक संबंधांसाठीही हे शिखर महत्त्वपूर्ण ठरू शकते.

ब्रिटन युरोपियन युनियन आणि त्याच्या व्यापार युनिटच्या बाहेर आहे. येथील ट्रेड मिनिस्टरने आधीच सांगितले आहे की भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि जपान यांच्याशी ज्या प्रकारचे व्यापार संबंध आहेत, ब्रिटनलादेखील असेच संबंध हवे आहेत.

0