आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Modi Told Biden The Principles Of Gandhi, The Great Chemistry Between The Leaders Of India USA Australia And Japan; News And Live Updates

10 फोटोंत QUAD आणि मोदी-बायडेन बैठक:​​​​​​​मोदींनी बायडेन यांना सांगितली गांधींची तत्त्वे, भारत-अमेरिका-ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या नेत्यांमध्ये दिसली उत्तम केमिस्ट्री

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानने चीनला काउंटर करण्यासाठी रणनीती मजबूत करणे सुरू केले आहे. शुक्रवारी झालेल्या क्वाड देशांच्या बैठकीत ड्रॅगनला कडक संदेश देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, इंडो-पॅसिफिकमध्ये चीनचे वाढते वर्चस्व थांबवण्यासाठी चार देशांनी सहमती दर्शवली आहे. या बैठकीमध्ये लसीकरण, हवामान बदल, जागतिक सुरक्षा आणि परस्पर संबंध मजबूत करण्यावरही चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. भेटीदरम्यान, बायडेन यांनी मोदींना गमतीशीपणे सांगितले की, मी जेव्हा 1972 मध्ये सिनेटर म्हणून निवडले गेलो होतो. तेव्हा बायडेन आडनाव असलेल्या व्यक्तीने मला मुंबईहून एक पत्र पाठवले होते. 2013 मध्ये उपराष्ट्रपती असताना ते मुंबईला गेले होते, तेव्हा पत्रकारांनी त्यांना आपला भारताशी काय संबंध आहे? असे विचारले होते. मग बायडेन यांनी ही घटना सांगितली होती. यानंतर माध्यमांत दुसऱ्या दिवशी भारत देशात बायडेन नावाचे 5 लोक राहतात हे समोर आले होते.

हा फोटो क्वाड देशांच्या अधिकृत बैठकीचा आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी डावीकडे बसले आहेत, बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, उजवीकडे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि त्यांच्या समोर जपानी पंतप्रधान योशीहिदे सुगा आहेत. बायडेन यांच्या मागे चारही देशांचे झेंडे आहेत.

फोटोमध्ये जपानी पंतप्रधान योशीहिदे सुगा क्वाडशी संबंधित आपला अजेंडा सांगत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन त्यांचे लक्षपूर्वक ऐकत आहेत. बैठकीत सुगा म्हणाले की, हे शिखर आमचे सामायिक संबंध आणि स्वतंत्र इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी आमची वचनबद्धता दर्शवते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. 20 जानेवारी रोजी बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोनवरून त्यांचे अभिनंदन केले. यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे.

शुक्रवारी झालेल्या संभाषणादरम्यान बायडेन यांनी महात्मा गांधींचाही उल्लेख केला. आम्ही या ग्रहाचे विश्वस्त असूनत्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

मोदी आणि बायडेन संभाषणादरम्यान खूप आरामदायक दिसत होते. 2014 आणि 2016 मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. बायडेन तेव्हा ओबामा प्रशासनाचे उपाध्यक्ष होते. यावेळी बैठकीत बायडेन यांनी त्यांच्या मुंबई भेटीची आठवण केली.

एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी दोन्ही नेत्यांनी इंटरप्रेटरला त्यांच्या जवळ बसवले होते. बायडेन इंग्रजीत बोलत होते आणि हिंदीत त्याचे भाषांतर करण्यात येत होते. तर दुसरीकडे, मोदी हिंदीत बोलले आणि त्याचे इंग्रजीत भाषांतर करण्यात येत होते.

राष्ट्रपती बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीदरम्यान दोन्ही देशांचे उच्च मुत्सद्दी देखील उपस्थित होते. भारतीय संघात एनएसए अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचाही समावेश होता. तर अमेरिकेच्या बाजूने परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन उपस्थित होते.

व्हाईट हाऊसमधील रूझवेल्ट रूमच्या अभ्यागतांच्या पुस्तकावर पंतप्रधान मोदींनी आपले अनुभव लिहिले आणि नंतर त्यावर स्वाक्षरी केली. केवळ निवडक राज्य प्रमुखच येथे येतात. राज्य मंत्रालयाने रूझवेल्ट रूमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेथे उपस्थित असलेल्या भारतीय वंशाच्या लोकांना हस्तांदोलन केले आणि शुभेच्छा दिल्या. मोदींच्या आगमनाच्या खूप आधी व्हाईट हाऊसच्या बाहेर लोक जमू लागले होते.

बातम्या आणखी आहेत...