आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचा 244 वा स्वातंत्र्य दिन:मोदींनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे उत्तर - अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी ट्विट केले - जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण स्वातंत्र्य आणि मानवी उपक्रमांना नेहमीच महत्त्व देता
  • ट्रम्प म्हणाले - चीनने व्हायरस लपवला, जगाला धोक्यात ठेवले आणि यामुळे होणाऱ्या नुकसानावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी देशाच्या 244 व्या स्वातंत्र्य दिवसाला देशाच्या नावाने संदेश दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्विट केले की, 'मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि येथील नागरिकांना अमेरिकेच्या 244व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण स्वातंत्र्य आणि मानवी उपक्रमांना नेहमीच महत्त्व देता, या मूल्यांची आम्ही कदर करतो.  यावर ट्रम्प यांनी उत्तर दिले की,  'धन्यवाद माझ्या मित्रा, अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे! '   ट्रम्प यांनी या निमित्ताने कोरोना पसरवणाऱ्या चीनला जबाबदार ठरवले आहे. ते म्हणाले की, 'चीनी व्हायरस (कोरोना) पसरण्यापूर्वी देशाचे प्रदर्शन चांगले होते. दशकांपासून अमेरिकेचा फायदा उचलणाऱ्या देशांवर टॅरिफ लगावण्यात आला. यामुळे आम्हाला काही चांगले ट्रेड डील्स करण्यात मदत मिळाली. आमच्या तिजोरीत अरबो रुपये येण्यास सुरूवात झाली. मात्र याच काळात आम्ही चीनमधून आलेल्या व्हायरसच्या कचाट्यात सापडलो.'

आम्ही साथीच्या रोगावर विजय मिळवण्याच्या अगदी जवळ आहोत : ट्रम्प

दक्षिण डकोटा येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले की, “आम्ही आपल्या मार्गाने लढा देऊन महामारीवर विजय मिळवण्याच्या जवळ आहोत.” आता देशात गाऊन, मास्क आणि शस्त्रक्रिया उपकरणे तयार केली जात आहेत. यापूर्वी ते परदेशात, विशेषत: चीनमध्ये तयार होत होते. याच देशातून आपल्या देशात व्हायरस पोहोचला. चीनने हा विषाणू लपविला, जगाला फसवले आणि त्यामुळे होणारे नुकसान झाकण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तो जगभर पसरला. संसर्ग पसरवण्यासाठी चीनला जबाबदार धरले पाहिजे. "

'आम्ही कट्टरपंथी डाव्यांचा पराभव करू'

ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन ध्येयवादी नायकांनी नाझींचा पराभव केला, फॅसिस्ट सैन्यांचा नाश केला आणि कम्युनिस्टांची सत्ता पालटली. त्यांनी अमेरिकेची मूल्ये आणि तत्त्वे जतन केली. आम्ही जगातील सर्व भागातून दहशतवाद्यांना दूर केले आहे. आता आम्ही कडवे डावे आणि तोडफोड करणाऱ्यांना हरवण्याचा प्रयत्न करीत आहोत. अमेरिकेत कृष्णवर्णियांचे समर्थन करण्यासाठी होत असलेल्या आंदोलनांदरम्यान लूटमार करणाऱ्यांना ते काय करत आहेत याचा अंदाज नाही. 

बातम्या आणखी आहेत...