आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Monday Positive | The U.S. City Of Carmel Turned Off The ‘red Lights’ By Making 140 Winding Roads, Reducing Accidents; 76 Thousand Lt. Petrol Savings, Pollution Also Reduced

मंडे पॉझिटिव्ह:अमेरिकी शहर कार्मेलने 140 वळणदार रस्ते बनवून ‘लाल दिवे’ बंद केले, अपघात घटले; 76 हजार लि. पेट्रोलची बचत, प्रदूषणही घटले

कारा बकले14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या शहरातील रस्त्यांवर एकही ट्रॅफिक सिग्नल किंवा थांबण्याचे संकेत नसतील तरीही अपघात नाहीच्या बरोबर. मृत्यूही मोजकेच आणि प्रदूषणातही घट झाली तर.. हे शक्य आहे का? होय.. हे शक्य करून दाखवले अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील कार्मेल शहराने! सुमारे एक लाख लोकसंख्येच्या कार्मेलमध्ये १४० वर वळणदार रस्ते (राउंडअबाऊट) आहेत.

आणखी डझनावर निर्माणाधीन आहेत. अमेरिकेत सर्वाधिक राउंडअबाऊट याच शहरात आहेत. मेयर (महापौर) जिम ब्रेनार्ड म्हणाले, यामागील मुख्य उद्देश सुरक्षा आहे. पारंपरिक चौकांच्या तुलनेत हे राउंडअबाऊट अपघात आणि मृत्यू कमी करतात. शहराचे माजी अभियंता माइक मॅक्ब्राइड यांच्या मते लाल दिवे नसल्याने वाहनांना थांबावे लागत नाही.

त्यामुळे प्रदूषणही कमी होते. यावरील अभ्यासानुसार राउंडअबाऊटमुळे वर्षभरात सुमारे ७६ हजार लिटर पेट्रोलची बचत होते. मिसिसिपी विद्यापीठाच्या संशोधनानुसार दोन राउंडअबाऊटमुळे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात ५६% पर्यंत घट दिसली.

किस्टोन पार्कवे
अमेरिकेतील इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ हायवे सेफ्टीनुसार कार्मेलच्या ६४ राउंडअबाऊटवरील अपघात ५०%पर्यंत घटले. डॉगबोनवर तर आणखी घट झाली. २०२० मध्ये शहरात १ लाख लोकांमागे वाहतूक मृत्यू दर १.९, तर उर्वरित शहरांत तो २०.८ होता. १९८० मध्ये महापौर ब्रेनार्ड यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेताना पहिल्यांदा राउंडअबाऊटचे फायदे कळाले.

१९९५ मध्ये कार्मेल महापौर झाल्यानंतर त्यांनी यावर काम सुरू केले. प्रथम १० वर्षांत ५० आणि पुढील दशकात यापेक्षाही जास्त वळणदार रस्ते तयार केले. फेडरल हायवे अॅडमिनिस्ट्रेशननेही वळणदार रस्ते प्रदूषण कमी करण्यात महत्त्वाचे असल्याचे मान्य केले. फ्लोरिडातील सारासोटानेही कार्मेलच्या धर्तीवर डझनभर रस्ते वळणदार बनवले. कार्मेलमध्ये याच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी नॅशनल राउंडअबाऊट वीकचे आयोजन केले जाते. यावर एक कॉफी टेबल बुकही बनवले गेले.

बातम्या आणखी आहेत...