आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिजाबविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान इराण सरकार काहीशी मवाळ भूमिका घेताना दिसत आहे. सरकारने मॉरेलिटी (नैतिकता) पोलिस संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. अॅटर्नी जनरल मोहंमद जफर मोंताजेरी यांनी इराणी वृत्तसंस्थेला सांगितले की, मॉरेलिटी पोलिसांचा न्यायव्यवस्थेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ती रद्द केली जात आहे. स्थानिक भाषेत मॉरेलिटी पोलिसांना “गश्त-ए-एरशाद’ म्हटले जाते. इंग्रजीत त्यास गायडन्स पेट्रोलिंग म्हणून ओळखले जाते. २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहंमद अहमदीनेजाद यांनी त्याची सुरुवात केली होती. इराणमध्ये १६ सप्टेंबरला २२ वर्षीय युवती महसा अमिनीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हिजाबविरोधी आंदोलन सुरू झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.