आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • More Deaths In Areas Where Pollution Is High In The United States; Harvard University Studies 3080 Counties

अहवाल:अमेरिकेत प्रदूषण जास्त असलेल्या भागात जास्त मृत्यू; हार्वर्ड विद्यापीठाने कोरोना प्रकरणांवर अमेरिकेतील 3080 कौंटींत केला अभ्यास

वॉशिंग्टन3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • युरोपात 100 सर्वाधिक प्रदूषित शहरांत इटलीची 24 शहरे

लिसा फ्रीडमॅन 

कोरोनामुळे प्रदूषणात घट झाल्याची छायाचित्रे लक्ष वेधून घेत आहेत. यासंबंधीचे आणखी एक तथ्य समोर आले आहे. जास्त प्रदूषित भागात कोराेना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही जास्त अाहे. प्रदूषण कमी असलेल्या भागातील संसर्गही कमी होता. त्यामुळे मृत्यूही कमी झाल्याचा दावा अमेरिकेतील एका देशव्यापी अभ्यासानंतर करण्यात आला आहे. 

हार्वर्ड विद्यापीठाने याबाबत अमेरिकेतील ३०८० कौंटींचे विश्लेषण केले. प्रदूषित कण (पीएम २.५) पातळी जास्त असलेल्या भागात मृत्यूंचे प्रमाणही जास्त राहिले. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे सांख्यिकीय गणनेच्या आधारे प्रदूषक कणांची संख्या जास्त असल्याचा परिणाम कोरोना आणि इतर आजारांवरील मृत्यूवर झाल्याचे स्पष्ट झाले. मॅनहॅटनमध्ये गेल्या वीस वर्षांत प्रदूषणाची पातळी एक मायक्राेग्रॅम प्रति क्युबिक मीटरपर्यंत आणू शकला असता तर कदाचित आपल्याला २४८ मृत्यू कमी पाहायला मिळाले असते. या संशोधनामुळे व्हेंटिलेटर्स व इतर श्वसनासंबंधी साधनांचा वापर कोरोना रुग्णांवर कशा प्रकारे करावा, हे ठरवण्यासही आरोग्य अधिकाऱ्यांना मदत मिळणार आहे. हार्वर्डचे डेटा सायन्स इनिशिएटिव्हचे संचालक फ्रान्सेस्का डॉमिनिकी म्हणाले, अनेक कौंटींमध्ये पीएम -२.५ ची पातळी १ क्युबिक मीटरमध्ये १३ मायक्रोग्रॅमहून जास्त आहे. अमेरिकेत सरासरी ८.४ पेक्षा तरी खूप जास्त आहे. प्रदीर्घ कालावधीत प्रदूषण वाढवल्यास कोरोनासंबंधीचा धोकाही वाढू शकतो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती १५-२० वर्षे जास्त प्रदूषणाचा सामना करत असल्यास कमी प्रदूषित भागात राहणाऱ्याच्या तुलनेत त्याच्या मृत्यूची शक्यता १५ टक्क्यांनी जास्त असेल.

युरोपात १०० सर्वाधिक प्रदूषित शहरांत इटलीची २४ शहरे

इटलीत कोरोनामुळे जास्त मृत्यूंना प्रदूषणाशी जोडून पाहिले जात आहे. हवेच्या गुणवत्तेची तपासणी करणाऱ्या स्विस एअर मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म आयक्यूएअरनुसार युरोपातील सर्वात प्रदूषित शहरांत २४ शहरे इटलीतील आहेत. त्यामुळेच संसर्ग वाढणे व मृत्यूदर वाढण्यामागे हवेतील प्रदूषण कारण ठरू शकते, असे संशोधकांना वाटते.  

बातम्या आणखी आहेत...