आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • More Deaths In The United States Than In The 9 11 Terrorist Attacks Were Caused By Pollution From The World Trade Center!

9/11ची 20 वर्षे:अमेरिकेत 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यापेक्षाही जास्त मृत्यू वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ढिगाऱ्यामुळे फैलावलेल्या प्रदूषणाने झाले!

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यूयॉर्कच्या ट्विन टॉवर्सवर ११ सप्टेंबर २००१ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे दुष्परिणाम अजूनही जाणवत आहेत. न्यूयाॅर्कच्या अग्निशमन दलाचे माजी सदस्य आणि अभिनेता स्टीव्ह बुसेनी यांच्या मते, इमारतीच्या ढिगाऱ्याच्या प्रदूषणामुळे अजूनही लोकांचा मृत्यू होत आहे. त्या हल्ल्यात ३ हजार लोक मारले गेले होते. पण इमारतीच्या विषारी कचऱ्यामुळे पसरलेल्या आजारांमुळे त्यापेक्षा जास्त लोकांनी प्राण गमावले आहेत.

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ सप्टेंबरला बुसेनी घटनास्थळी पोहोचले होते. ते कचरा वाहून नेणाऱ्या टीम बकेट ब्रिगेडचे सदस्य होते. इमारतीच्या वरच्या मजल्यांवरून बादल्यांत अवशेष खाली आणण्यात आले. त्याशिवाय बॉडी बॅगही होत्या. बुसेनींनी सांगितले की,‘एका बॉडी बॅगसोबत काँक्रीटची धूळ पाहून एका कर्मचाऱ्याने म्हटले होते की, ही धूळ कदाचित वीस वर्षांनंतर आमचे प्राण घेईल. पण वीस वर्षेही लागली नाहीत. ढिगारा हटवला जात असतानाच नवीन आजारांच्या बातम्या येऊ लागल्या.’

या विषयावर ब्रिजेट गॉर्मी यांनी ‘डस्ट : द लिंगरिंग लीगसी ऑफ ९/११’ हा वृत्तपट बनवला आहे. ब्रिजेट यांचे वडील बिली यांचा २०१५ मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला. टॉवरच्या आजूबाजूची हवा सुरक्षित आहे, असे सरकार आणि न्यूयॉर्क शहराचे अधिकारी घोषित करत आहेत, पण हवेत कार्सिनोजेन या विषारी रसायनाचा दाट थर आहे, असे वृत्तपटात दाखवले आहे. तज्ञांच्या मते, मानवी त्वचेवर ओले सिमेंट टाकल्याने त्वचा जळू लागते. अगदी तसेच येथे होत आहे. बुसेनी म्हणाले की,‘मी घटनास्थळी एक आठवड्यापेक्षाही कमी काळ होतो, पण काहीतरी गडबड आहे हे घरी गेल्यानंतर जाणवले. मला डॉक्टरांकडे जावे लागले. आमच्या पथकातील अनेकांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला. पण ते अजूनही झालेला त्रास सांगण्यास कचरतात.’

अग्निशमन दलातील सदस्यांना २० वर्षांनंतरही कफाची समस्या
फ्रेंड्स ऑफ फायर फाइटर्स ही संस्था अग्निशमन दलातील कार्यरत व निवृत्त सदस्यांना आरोग्याबाबत मोफत सल्ला देते. हल्ल्यानंतर काही दिवसांनी अमेरिकी काँग्रेसने पीडितांसाठी भरपाई निधी तयार केला. पैसा संपत असल्याने फंडिंगसाठी मोहीम हाती घ्यावी लागली. अखेर २०१९ मध्ये मागणी पूर्ण झाली होती. माजी सदस्यांना २० वर्षांनंतरही कफाची समस्या जाणवत आहे. अनेकांचे प्राण गेले.

बातम्या आणखी आहेत...