आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात नापा कौंटी परिसरात वणव्यामुळे १.२ लाख एकर भागातील वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. त्यामुळे पासो रोबल्समध्ये तापमान ४६ अंश सेल्सियसवर पोहोचले होते. १९७० मध्ये ये ४३ अंश तापमान होते. वन विभागाने ४.२ कोटी लोकांना प्रचंड उष्णतावाढीचा इशारा दिला आहे. ३० हून जास्त ठिकाणी २० हजार घरे व इमारतींमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. सुमारे १५ लाख लोकसंख्येवर अंधाराचे संकट आेढवले आहे. उत्तर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सोनामा व नापा भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या भागात डझनावर घरे खाक झाली. त्यामुळे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी राज्यात आणीबाणी लागू केली. त्यांनी आगामी ४८ तास सतर्क राहण्याचे आवाहन केले. लॉस एंजलिस महापौरांच्या म्हणण्यानुसार अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझविण्याच्या कामात व्यग्र आहेत. त्याशिवाय विमानांद्वारेदेखील रसायनाचा शिडकावा करून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू होते.
ऑगस्टपर्यंत ५ हजारांहून जास्त घटना
यंदा कॅलिफोर्नियातील वन क्षेत्रात आगीच्या ५६७२ घटना घडल्या. त्यात २.०४ लाख एकर जंगल खाक झाले. ७८ मोठ्या इमारती-घरांची हानी झाली. २०१९ मध्ये कॅलिफॉर्नियात ८५ वर्षांतील सर्वात भीषण वणवा पसरला होता. त्यात ३१ जणांचा मृत्यू झाला होता तर शेकडो लोक बेपत्ता झाले होते. गेल्या वर्षी वणव्याच्या ७८६० घटना घडल्या. त्यात २.५९ लाख एकर जंगल खाक झाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.