आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध:न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांना 3 वर्षांत 100 पेक्षा जास्त धमक्या

वेलिंग्टन20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

| न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांना दिल्या जणाऱ्या धमक्यांमध्ये तीनपट वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लसीकरणाबबात केलेले वक्तव्य, त्यानंतर लावलेल्या कोरोना निर्बंधांविरोधात संसदेबाहेर रस्त्यावर नागरिकांनी निदर्शने केली होती. तेव्हापासून त्यांच्याविरोधात हिंसक वक्तव्ये केली जात आहेत. अधिकृत माहिती अधिनियमांतर्गत जारी करण्यात आलेल्या नव्या डेटावरून कळते की, पंतप्रधानांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांवरून पोलिसांनी २०१९ मध्ये १८, २०२० मध्ये ३२ आणि २०२१ मध्ये ५० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पंतप्रधानांविरोधात लसीकरण विरोधी गटांकडून रोज अपशब्द वापरले जात आहेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत. फेब्रुवारीत संसदेबाहेर झालेल्या निदर्शनावेळी रस्त्याचा ताबा घेत हिंसाचार झाला आणि पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर संसद मैदानात जाळपोळ करण्यात आली.

२ पुरुषांना वारंवार केली अटक, पाठलागही केला
पंतप्रधान जेसिंडा यांना धमक्या देण्याच्या आरोपात दोन पुरुषांना वारंवार अटक करण्यात आली. या वर्षी पीएमची हत्या करण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केली आहे. तसेच कारने त्यांचा पाठलागही करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...