आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • More Than 30% Of The Vernacular Will Be Extinct, And The Knowledge Of Medicinal Plants Is In Danger; News And Live Updates

झुरिच विद्यापीठाचे संशोधन:शतकअखेरपर्यंत 30% पेक्षा जास्त स्थानिक भाषा लोप पावणार, औषधी वनस्पतींचे ज्ञानही धोक्यात

झुरिच11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक शतके जुने उपचार इतिहासजमा होण्याचे संकट

जगात औषधी वनस्पती लोप पावण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे अनेक वर्षे जुन्या उपचारांचे ज्ञानही धोक्यात आहे. कारण जगातील वेगवेगळ्या भागांत स्थानिक भाषा लोप पावणार आहेत. ही माहिती झुरिच विद्यापीठाच्या संशोधनात समोर आली आहे. संशोधनासाठी चमूने भाषा आणि जैव विविधतेच्या आधारावर उत्तर अमेरिका, उत्तर- पश्चिम अॅमेझोनिया आणि न्यू गिनीत २३० स्थानिक भाषांशी संबंधित १२,००० औषधी वनस्पतींचा अभ्यास केला. त्यांना असे आढळले की, उत्तर अमेरिकेत ७३% औषधी ज्ञान फक्त एका भाषेत, उत्तर-पश्चिम अॅमेझोनियात ९१%, आणि न्यू गिनीत ८४% ज्ञान एकाच भाषेत आढळते.

डॉ. रॉड्रिगो म्हणाले, ‘भाषा लोप पावल्या तर औषधी वनस्पतींचे पारंपरिक ज्ञान समाप्त तर होईलच शिवाय संपूर्ण यंत्रणेवर त्याचा परिणाम होईल. कारण आपण त्यांच्या संरक्षणासाठी काही विशेष करू शकणार नाही.’ निसर्गात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींचे ज्ञान स्थानिक भाषांत मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे स्थानिक भाषा लोप पावल्यास कोणत्या वनस्पतीला काय म्हणतात आणि तिचे वैशिष्ट्य काय, हे सांगणारे कोणीच मिळणार नाही. यूएननुसार जगात ७४०० भाषांपैकी ३०% पेक्षा जास्त शतकअखेरपर्यंत लोप पावण्याची शक्यता आहे.

२०२२-३२ स्वदेशी भाषांचे आंतरराष्ट्रीय दशक
सध्या बोलल्या जाणाऱ्या १,९०० पेक्षा जास्त स्थानिक भाषांत १०,००० पेक्षा कमी वक्ते आहेत. संयुक्त राष्ट्रांनी २०२२-३२ ला स्वदेशी भाषांचे आंतरराष्ट्रीय दशक जाहीर केले आहे. केंट विद्यापीठातील डॉ. जोनाथन लोह म्हणाले की, स्थानिक भाषांत अज्ञात वनस्पतींचे मौलिक ज्ञान असू शकते. देशी भाषा लोप पावल्या तर पुन्हा कधीच परत मिळणार नाही.

बातम्या आणखी आहेत...