आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेने गेल्या ५० वर्षांत प्रत्येक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. परंतु, गरिबीच्या समस्येत खरी सुधारणा झालेली नाही. केंद्र सरकारच्या दारिद्र्यरेषेनुसार १९७० मध्ये १२.६ टक्के लोकसंख्या गरीब होती. १९९० मध्ये १३.५ टक्के लोकसंख्या गरीब होती, २०१० मध्ये १५.१ टक्के आणि २०१९ मध्ये १०.५ टक्के होती. २९ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गरीब मानले जाते.
इतर अमेरिकन लोकांप्रमाणेच गरिबांनाही परवडणाऱ्या दैनंदिन गरजा उपलब्ध आहेत. यावर ब्रुकिंग्ज संस्थेचे वरिष्ठ फेलो रॉन हॅस्किन्स आणि इसाबेल सॉहिल म्हणतात की, टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि मोबाइल फोन यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंपर्यंत लोकांची पोहोच हे गरीब इतके गरीब नाहीत हे दर्शवते. मोबाइल फोनसारख्या गोष्टी नक्कीच स्वस्त झाल्या आहेत, पण आरोग्य सेवा आणि घरभाडे यांसारख्या जीवनावश्यक गोष्टींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शहरांमध्ये वीस वर्षांत घरभाडे दुपटीने वाढले आहे. २००० ते २०२० दरम्यान सरासरी अमेरिकन शहरात इंधन आणि विजेच्या किमती ११५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
घरांचे भाडे जास्त, आरोग्य सुविधांसह इतर काही अत्यावश्यक सेवा आणि त्या प्रमाणात कामगारांचे वेतन वाढत नसल्याने गरिबीची पातळी कमी होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इतर देशांतून येणाऱ्या एकतृतीयांशहून अधिक लोकांना किमान वेतन मिळत नाही. ८५% ओव्हरटाइम दिला गेलेला नाही. महागाईचा विचार केला तर १९९५ नंतर कामगारांच्या वेतनात दरवर्षी केवळ ०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी तफावत आहे. हायस्कूल पदवीधर कामगार १९७९ च्या तुलनेत २०१७ मध्ये २.७ टक्के कमी कमावत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.