आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आभासी विश्वातील सर्वात मोठा व्यवहार:18 कोटींत प्लॉटची विक्री; त्यावर होतील डिजिटल फॅशन शो अन् विकले जातील आभासी ड्रेस

लंडन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिअल इस्टेटमध्ये यशाचा मूलमंत्र आहे लोकेशन, पण आभासी जगातही हाच फॉर्म्युला प्रभावी आहे हे खूपच कमी लोकांना माहीत असेल. त्याचा ताजा पुरावा म्हणजे ऑनलाइन एन्व्हायर्नमेंट डिसेंट्रालँडचा सर्वात महाग व्यवहार. क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदार डिसेंट्रालँड आणि टोकन्सडॉटकॉमनुसार, ऑनलाइन जगात व्हर्च्युअल रिअल इस्टेटचा एक भाग विक्रमी १८ कोटी रुपयांत विकला गेला. हा संपूर्ण व्यवहार ‘माना’ या क्रिप्टोकरन्सीद्वारे झाला.

ही जमीन डिसेंट्रालँडच्या नकाशानुसार ‘फॅशन स्ट्रीट’ भागात आहे. तिचा वापर डिजिटल फॅशन कार्यक्रमांत यजमानपदासाठी आणि अवतारांसाठी व्हर्च्युअल कपडे विक्रीसाठी केला जाईल. डिसेंट्रालँड एक ऑनलाइन एन्व्हायर्नमेंट आहे, त्याला ‘मेटाव्हर्स’ही म्हटले जाते. युजर येथे जमीन खरेदी करू शकतात, इमारतींची पाहणी करू शकतात, हिंडू-फिरू शकतात आणि अवताराच्या रूपात लोकांना भेटू शकतात. महामारीच्या काळात अशा प्रकारच्या एन्व्हायर्नमेंटची लोकप्रियता वाढली आहे. घरी राहत असल्याने लोकांनी आपला बहुतांश वेळ ऑनलाइन घालवला आहे. फेसबुकने मेटाव्हर्ससाठी व्हर्च्युअल रिअॅलिटी प्रॉडक्ट्सला डेव्हलप करण्याचे उद्दिष्ट ठरवून आपले नाव बदलून मेटाव्हर्स केल्यानंतर व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये लोकांचा रस गेल्या महिन्यात आणखी जास्त वाढला. डिसेंट्रालँड ब्लॉकचेनचा वापर करते. त्यावर जमीन आणि इतर वस्तू टोकनच्या (एनएफटी) रूपात विकल्या जातात. ही एक प्रकारची क्रिप्टो संपत्ती आहे. क्रिप्टोकरन्सीचे शौकीन डिसेंट्रालँडच्या ‘माना’ या क्रिप्टोकरन्सीचा वापर करून तेथे जमीन खरेदी करतात.

टोकन्सडॉटकॉमचे सीईओ अँड्रयू किगुएल यांनी सांगितले की, संपत्ती मेटाव्हर्स ग्रुपकडे आधीपासून असलेल्या रिअल इस्टेटची सहायक संपत्ती असेल. जूनमध्ये डिसेंट्रालँडमध्ये व्हर्च्युअल जमिनीचा एक भाग १२,९५,००० ‘माना’मध्ये विकण्यात आला होता. म्हणजे त्याची किंमत तेव्हा ६.७९ कोटी रुपये होती. या प्लॉटवर खरेदीदारांनी डिजिटल अॅड्रेस विकण्यासाठी एक व्हर्च्युअल शॉपिंग सेंटर बनवले होते.

अगदी खऱ्या प्रॉपर्टीप्रमाणे दिसते, युजर्स तिची सजावटही करू शकतात
डिसेंट्रालँड ११६ लहान पार्सलने बनलेले आहे. प्रत्येक पार्सल ५२.५ चौरस फुटांचे आहे, जमिनीचा एकूण आकार ६,०९० व्हर्च्युअल चौरस फूट आहे. तेथे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सचा वापर करून व्हर्च्युअल साहित्याची निर्मिती आणि त्याचा व्यापार होतो. क्रिप्टोकरन्सीद्वारे युजर व्हर्च्युअल कपडे, अॅक्सेसरी खरेदीसह व्हर्च्युअल लँड पार्सल व इस्टेटही घेऊ शकतात. हे पार्सल अगदी खऱ्या प्रॉपर्टीप्रमाणे दिसतात. येथे युजर्स आपल्या अवतारांमार्फत भेटू शकतात. मौल्यवान वस्तूंद्वारे ते स्थान सजवूही शकतात.

बातम्या आणखी आहेत...