आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Most PowerFull Womes | Marathi News | Nirmanala Sitaraman | Finance Minister Sitharaman Ranked 37th Among The Most Powerful Women In The World

फोर्ब्ज सर्वेक्षण 2021:जगातील सर्वात शक्तिशाली महिलांत अर्थमंत्री सीतारमण 37 व्या स्थानी; मॅकेन्झी स्कॉट पहिल्या तर कमला हॅरिस दुसऱ्या स्थानी

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोर्ब्जच्या यादीत रोशनी नाडर यांना 52 वे आणि किरण मजुमदार शॉ यांना 72 वे स्थान

जगातील सर्वात चर्चेत राहणारे मॅगझिन फोर्ब्जने भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सलग तिसऱ्यांदा जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समाविष्ट केले आहे. त्यांना ३७ वे स्थान देण्यात आले आहे. सीतारमण यांनी या वेळी आपल्या स्थानात चांगली सुधारणा केली आहे. त्या अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांच्यापेक्षाही दोन पायऱ्या वर आहेत.

मेकेंजा स्कॉट यांना पहिले स्थान मिळाले आहे. मेकेंजा जगातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉन ग्रुपचे मालक जेफ बेजोस यांच्या माजी पत्नी आहेत. २०१९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. यादीत दुसऱ्या स्थानावर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आहेत. यादीत या वेळी चार भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

फाल्गुनी नायर यांना मिळाले ८८ वे स्थान : फोर्ब्जच्या यादीत नायकाच्या संस्थापक आणि सीईओ फाल्गुनी नायर यांना ८८ वे स्थान मिळाले आहे. फाल्गुनी नायर या शेअर बाजारात आपल्या कंपनीच्या जोरदार सुरुवातीनंतर भारतातील ७ व्या महिला अब्जाधीश बनल्या आहेत. एचसीएल टेक्नॉलॉजीच्या अध्यक्ष रोशनी नाडर यांना ५२ वे स्थान मिळाले आहे. रोशनी नाडर देशातील एखादा आयटी कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या अधिकारी महिला आहेत. बायोकॉनच्या संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष किरण मजुमदार शॉ यांना ७२ व्या स्थानी ठेवण्यात आले आहे.

यादीत ४० महिला सीईओ आणि १९ जागतिक नेते : अमेरिकेतील बिझनेस मॅगझिन फोर्ब्ज दरवर्षी जगातील १०० शक्तिशाली महिलांची यादी जाहीर करते. या वर्षी शक्तिशाली महिलांच्या १८ व्या वार्षिक यादीत ४० महिला अशा आहेत ज्या कोणत्या ना कोणत्या कंपनीत सीईओपदावर कार्यरत आहेत. यादीत १९ जागतिक नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे.

रोशनी नाडर
निर्मला सीतारमण
किरण मजुमदार शॉ
फाल्गुनी नायक
मॅकेन्झी स्कॉट पहिल्या तर कमला हॅरिस दुसऱ्या स्थानी

बातम्या आणखी आहेत...