आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाची लागण :अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तांचे भाऊ अनीसकडून खंडन

कराचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनीसने म्हटले- ट्रांसपोर्टचा बिझनेस सुरू केला आहे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तांचे दाउदचा भाऊ अनीस इब्राहिमने खंडन केले आहे. अनीस म्हटला की, कोरोना महामारी खूप भयंकर आहे, परंतू दाऊ आणि त्याची पत्नी पॉझिटिव्ह नाही. दाऊद पाकिस्तान आणि यूएईमध्ये आपला बिझनेस चालवत आहे.

दाऊदचा स्टाफ आणि गार्ड्स क्वारेंटाइन केल्याची रिपोर्ट
यापूर्वी इंटेलिजेंस एजेंसींनी दाऊद आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले होते. तसेच, दोघे कराचीमधील मिल्ट्री हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा दावाही यात करण्यात आला होता. यात म्हटले होते की, दाऊदचे सुरक्षारक्षक आणि स्टाफही क्वारेंटाइन करण्यात आला आहे.

अनीसने म्हटले- ट्रांसपोर्टचा बिझनेस सुरू केला आहे
रिपोर्ट्सनुसार न्यूज एजेंसी आयएएनएसने दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमशी फोनवर चर्चा केली. एजेंसीनुसार, अनीस कुठून बोलत होता, याबाबत माहिती नाही. या बातचीतदरम्यान अनीसने सांगितले की, भाऊ आणि शकील ठीक आहेत. कोणालाच कोरोनाची लागण झाली नाही. कुटुंबातील कोणताच सदस्य रुग्णालयात दाखल नाही.

अनीसने पुढे सांगितले की, डी कंपनी पाकिस्तान आणि दुबईमधून आपला बिझनेस चालवत आहे. यादरम्यान त्याने सांगितले की, हॉटेल आणि कंस्ट्रक्शनसोबत ट्रासंपोर्टचा बिझनेसही सुरू केला आहे.

0