आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​झोपेअभावी बाळाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या देखभालीत आईच्या पदरी तीन ते सात वर्षांचे प्रौढत्व

लॉस एंजलिस16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील अध्ययनाचा निष्कर्ष

बाळाला जन्म दिल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने त्यांची देखभाल करताना मातेचे वय तीन ते सात वर्षांनी वाढते. म्हणजे प्रसूतीनंतर अशा प्रौढत्वाबरोबर स्त्रीच्या आराेग्यावरही परिणाम होऊ शकतो. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या एका अभ्यासात हा निष्कर्ष समोर आला आहे. या अभ्यास प्रकल्पाच्या सदस्य डॉ. ज्युडिथ कॅरोल म्हणाल्या, रात्री उशिरापर्यंत बाळाला स्तनपान करणे, त्यांची नॅपी बदलणे आणि एकूण देखभालीची अशी अनेक कामे या काळात महिलांना करावी लागतात. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्यांची झोप नियमितपणे सात तासांहून कमी होती.

त्याचा परिणाम मातांच्या वयावर होतो. म्हणजे त्या मूळ वयापेक्षा जास्त वयाच्या वाटू लागतात. या समस्येपासून बचाव कसा करावा याचा उपायदेखील त्यांनी सांगितला. नुकत्याच प्रसूती झालेल्या मातांनी मिळेल तेव्हा झोप काढावी. मदतीची गरज असेल तेव्हा पती, जोडीदार, आजी-आजोबांचे सहकार्य घेतले पाहिजे. बाळाच्या सुरुवातीच्या देखभालीचा परिणाम त्याच्या वडिलांवरदेखील होतो, असे ज्युडिथ यांना वाटते. झोप नसल्याने त्यादेखील जास्त प्रौढ दिसू शकतातया प्रकल्पातील या प्रकल्पात ३३ मातांची पाहणी करण्यात आली.

आणखी अभ्यासाची गरज
डॉक्टर कॅरोल म्हणाल्या, या विषयात आणखी अभ्यासाची गरज आहे. वयातील ही वाढ स्थायी स्वरूपाची असते का ? की पुढील काही वर्षांत ती झीज भरून काढता येते? याचाही अभ्यास व्हायला हवा.

पुरेशा झोपेअभावी आजारांची शक्यता वाढते
बाळ जन्मल्यानंतरचे सहा महिने अत्यंत महत्त्वाचे असतात. यादरम्यान झोपेअभावी अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. सहा महिन्यांनंतर झोपेच्या अभावाचा परिणाम दिसून आला नाही.

बातम्या आणखी आहेत...