आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछायाचित्र इस्रायलच्या तेल अवीवचे आहे. तेथे नेतन्याहू सरकारकडून कोर्टाची शक्ती घटवण्याच्या प्रस्तावाविरुद्ध सुरू असलेले आंदोलन ९ व्या आठवड्यात पोहोचले आहे. शनिवारी रात्री दीड लाखांहून जास्त लोक रस्त्यावर उतरले. हे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन आहे.
आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांसोबत चकमक उडाली. पोलिसांनी जारी केलेल्या फुटेजमध्ये आंदोलक अडथळा मोडून पुढे जाताना दिसले. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. सरकारने न्यायालयाबाबत दुरुस्ती विधेयक मांडल्यानंतर जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सुधारणेबाबत तज्ज्ञ म्हणाले की, यामुळे सर्वोच्च न्यायालयाची शक्ती जवळपास संपुष्टात येईल. याचा फायदा नेतन्याहूंना मिळेल. त्यांच्यावर भ्रष्टाचारासह अन्य अनेक आरोप आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.