आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला सबलीकरणावर यूएनमध्ये मतदान:इराणला बाहेर करण्याचा प्रस्ताव मंजूर, भारतासह 16 देश गैरहजर

संयुक्त राष्ट्रे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रात समानता व महिला सबलीकरणला प्रोत्साहन देणारे वैश्विक आंतरसरकारी शाखेने इराणला बाहेरचा रस्ता दाखवण्यासंबंधीच्या मसुद्याचा प्रस्ताव २९ मतांनी मंजूर केला. चीन, रशिया व कझाकिस्तानसह ८ देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. भारत, बांगलादेश, इंडोनेशिया, मॉरिशस, मेक्सिको व थायलंडसह १६ देशांनी मतदानापासून अंतर राखले. अमेरिकेने इराणमध्ये महिलांच्या छळाचा हवाला देते त्यांना “कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन’वर्ष २०२२-२६ च्या उर्वरित कार्यकाळासाठी हटवण्याचा प्रस्ताव सादर केला. मसुद्यानुसार, इराणने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह महिला अधिकारांचे सतत उल्लंघन केले आहे. अमेरिकी विदेशमंत्री अँटीन ब्लिंकन म्हणाले, इराणच्या लोकांना जगातून पाठिंबा आहे.

बातम्या आणखी आहेत...