आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिफोर्निया:कोरोनामुळे दररोज 500 मृत्यू होत असलेल्या कॅलिफोर्नियात लसीकरणाविरोधात आंदोलन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅलिफोर्निया लसीकरणाला विरोध करणारे जुने केंद्र, मुलांचे लसीकरण हा इथे मुख्य मुद्दा

मैनी फर्नांडिस
कोरोना महामारीच्या काळात अनेक महिन्यांपर्यंत मास्क आणि लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन करणारे आंदोलनकर्ते आता कोविड-१९ लसीच्या विरोधातही उभे आहेत. काही लोकांनी लसीच्या विरोधात डोजर स्टेडियममध्ये सार्वजनिक लसीकरणाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर आंदोलन केले. कॅलिफोर्नियाच्या अनेक राज्यांत अजूनही कोरोनाचा प्रसार सुरू आहे. तरीही लसीकरणाच्या विरोधातील एक जुने अप्रिय केंद्र राहिले आहे. मागच्या आठवड्यात कॅलिफोर्नियात दररोज सरासरी ५०० नागरिकांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आणि लवकरच ते न्यूयॉर्कला मागे टाकत सर्वात जास्त मृत्यू होणारे राज्य ठरेल.

काही महिन्यांपासून कट्टर उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते मास्क वापरण्याचा नियम व लॉकडाऊनमुळे शिवाय कर्फ्यू आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात रॅली काढत आहेत. ते याला व्यक्तिगत स्वातंत्र्यात सरकारी हस्तक्षेप मानतात. पण आता मास्क आणि लॉकडाऊन हे अमेरिकेच्या जनजीवनाचा भाग बनला आहे, तर काही आंदोलनकर्त्यांनी आपला विरोध आणि राग कोविड-१९ च्या लसीवर काढला आहे. मागच्या आठवड्यात या आंदोलनकर्त्यांच्या एका छोट्या गटाने डोजर स्टेडियमवर लसीकरणाच्या ठिकाणी गोंधळ निर्माण केला. या स्टेडियममध्ये रोज सरासरी ६१२० लोकांना लस दिली जाते. आंदोलनकर्त्यांनी ‘डोंट बी लॅब रेट’ आणि ‘कोविड स्कॅम’ असे फलक हातात घेतले होते.

हा निषेध वाढत्या संघर्षाची चिन्हे आहेत, ज्याच्या अंतर्गत लसीकरणाचे विरोधक दीर्घकाळापासून मुद्दा मांडत आहेत की, स्कूल व्हॅक्सिन अनिवार्यता कायदा हे सरकारी सक्तीचे एक प्रतीक आहे. काही लोकांना आधीपासूनच या लसीकरणाच्या शास्त्रावर शंका आहे. काहींचा दावा आहे की, हे लसीकरण बालकांमधील ऑटिझमला कारणीभूत ठरते.

कॅलिफोर्नियात हॉलीवूड कलाकार आणि श्रीमंत पालकांमध्ये दशकांपासून लसीकरणाच्या विरोधातील आंदोलन लोकप्रिय आहे. २०१५ मध्ये इथे मुलांसाठी देशात सक्तीच्या लसीकरणाबाबत कायदा संमत करण्यात आला. याआधी पालक मुलांना लस देणे टाळतात. लसीकरण व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचा त्यांचा दावा आहे. पण कायद्यानंतर लसीकरण टाळण्याचा पर्याय बंद झाला आहे. राज्यात लसीकरणविरोधी कार्यकर्ते दीर्घकाळापासून आक्रमक आहेत. पण कोरोना महामारीच्या काळात त्यांनी धमकावण्याची रणनीती वापरली. विरोध करताना त्यांनी सॅक्रामेंटोमध्ये एका आमदाराला मारहाण केली.

मागच्या महिन्यात महिलांच्या एका गटाने बजेटच्या सादरीकरणादरम्यान खासदारांना धमकी दिली, की आम्ही उगाचच बंदुकांची खरेदी केलेली नाही. स्टेट सिनेटर आणि बालरोगतज्ज्ञ रिचर्ड पेन यांच्या मते, या प्रकरणात विरोधकांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. पेन यांनीच लसीकरणासंबंधित कायदा तयार केला आहे. या आंदोलनामुळे लसीकरणाबद्दल चुकीचा समज पसरवला जातोय, शिवाय लसीकरणाविषयी जागृती करणाऱ्या लोकांना धमकावल जात आहे, याकडे ते लक्ष वेधतात.

बेसबाॅल खेळाडू्च्या मृत्यूमुळे घाबरले
डोजर स्टेडियमवर आंदोलन करणाऱ्यांच्या मते, त्यांनी लसीकरणाच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला नाही. ते लस घेणाऱ्या लोकांना लसीचे दुष्परिणाम सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेले होते. आंदोलनाचे प्रमुख जेसन लेफकोविट्ज यांनी सांगितले, की प्रसिद्ध बेसबॉल खेळाडू हंक आरोन यांचा मृत्यू हे विरोधाचे कारण आहे. ते ८६ वर्षांचे होते. २२ जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. ५ जानेवारीला त्यांनी लस घेतली होती.