आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Mullah Baradar Hibatullah Akhundzada | Where Is Taliban Leaders Mullah Baradar And Hibatullah Akhundzada; Rumors Of Baradar And Akhundzada Death Returns Again

जिवंत की ठार:कुठे आहेत तालिबानचे दोन सर्वोच्च नेते मुल्ला बरादर आणि अखुंदझदा; हक्कानी नेटवर्कसोबतच्या संघर्षात ठार किंवा गंभीर असल्याची चर्चा

काबुल3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलचा ताबा घेतला. आठवडाभरापूर्वी सरकारची घोषणाही करण्यात आली होती. त्याचा शपथविधी सोहळा होणार की नाही, कधी आणि कसा होईल? असे सर्व प्रश्न लोकांच्या मनात आहेत. मोठा प्रश्न हा आहे की, तालिबानचे मोठे नेते कुठे आहेत आणि ते जगासमोर का येत नाहीत?

हेबतोल्ला अखुंदझदा सर्वोच्च नेता आणि मुल्ला अब्दुल गनी बरादर याला उपपंतप्रधान म्हणून घोषणा झाली. हे दोघे आतापर्यंत कुठेही दिसलेले नाहीत. बरादरने दोन दिवसांपूर्वी 39 सेकंदांच्या कथित ऑडिओ टेप जारी करून आपण सुखरूप असल्याचा दावा केला. पण, तो टेपच खरा होता का असा प्रश्न आहे.

प्रश्न उद्भवणे सहाजिक
सीएनएनने तालिबानमध्ये सुरू असलेल्या शंका-कुशंकांवर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यानुसार, कुठल्याही देशात सरकारची घोषणा होताच तेथील नेते जगासमोर येतात. ​​​​​​​माध्यमांशी बोलतात. परंतु, अफगाणिस्तानमध्ये तसे काही दिसत नाही. त्यामुळे, सरकारची घोषणा झाल्यानंतर हे नेते कुठे गेले असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांना त्यांच्या नेत्यांबद्दल प्रश्न विचारले की ते प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करतात.

बरादार जिवंत आहे की मारला गेला
दोन दिवसांपूर्वीच तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने मुल्ला बरादर​​​​​​​चा ऑडिओ टेप जारी केला. त्यात त्याने आपण ठणठणीत आणि सुरक्षित असल्याचा दावा केला. आता या ऑडिओ क्लिपच्या क्वालिटी आणि सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तालिबानी शासनाचाच भाग राहिलेल्या हक्कानी नेटवर्कसोबतच्या संघर्षात मुल्ला बरादर ठार किंवा गंभीर जखमी झाल्याचा इंदाज आहे. तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यातील संघर्ष सरकारच्या घोषणेपूर्वीच झाल्याचा दावा केला जात आहे. म्हणजेच, प्रकरण गेल्या आठवड्याचेच आहे. मुल्लाच्या सहाय्यकाने हे निवेदनही जारी केले होते. ऑडिओ टेप फक्त 39 सेकंदांची होती.

हिबतोल्लाही गायब
तालिबानचा सर्वोच्च नेता हेबतोल्ला अखुंदझदा लवकरच जगासमोर येऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात होते. हे निवेदन येऊनही 15 दिवस उलटले अद्याप अखुंदझदाचा पत्ता नाही. अखुंदझदा एक तर मारला गेला आहे किंवा गंभीर आजारी आहे. जर तसे नसेल तर तो आतापर्यंत पुढे का आले नाही? कतारची राजधानी दोहामध्येही त्याचा ठावठिकाणा नव्हता. 2016 मध्ये अखुंदझदा तालिबानचा नेता बनला. 5 वर्षांत, त्याचे कोणतेही विधान कोणत्याही स्वरूपात बाहेर आले नाही. गेल्या वर्षी अशी बातमी आली होती की अखुंदझदा खूप आजारी आहे आणि पेशावरमध्ये त्याचा मृत्यू झाला.

हा प्रश्न देखील मोठा
अमेरिका आणि तालिबान यांच्यातील करार कतारची राजधानी दोहा येथे झाला. मुल्ला बरदार तालिबान शिष्टमंडळाचे नेतृत्व करत होते. ते पंतप्रधान होतील असे मानले जात होते, पण तसे झाले नाही. हसन अखुंदला पंतप्रधान करण्यात आले. आता सर्वात मोठा प्रश्न. तालिबानवर सर्वात मोठा असर-ओ-रसूख म्हणजेच प्रभाव या क्षणी कतारचा आहे. त्याचे परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद अब्दुल रहमान अल थानी रविवारी काबूलमध्ये आले. तालिबानचा दावा आहे की ते हेबतुल्ला अखुंदझदा यांना कंधारमध्ये भेटले होते, परंतु याचा कोणताही फोटो समोर आला नाही. बाकी सोडा, तालिबानच्या प्रवक्त्याने या बैठकीला दुजोरा दिला नाही. कतारनेच भेटीबाबत अधिकृत माहिती दिली होती.

एवढा बुरखा का?
तालिबानवर बारकाईने नजर ठेवणारे पाकिस्तानी पत्रकार आझाद सय्यद म्हणतात - बहुतेक तालिबान नेते आणि विशेषत: हक्कानी नेटवर्कचे लोक वॉन्टेड आहेत. त्यांना वाटते की शत्रू (अमेरिका) त्यांना कधीही लक्ष्य करू शकतो. म्हणूनच ते दिसत नाहीत.तसे, तालिबान गोष्टी लपवण्यात पटाईत आहेत. त्याचा पहिला नेता आणि संस्थापक मुल्ला उमरला अमेरिकेने 2013 च्या सुरुवातीला ठार केले होते. तालिबानने वर्षाच्या अगदी शेवटी ही माहिती दिली. खरं तर, तालिबान नेतृत्वाला वाटते की नेत्यांच्या मृत्यूच्या बातमीने संघटना मोडू शकते आणि त्यांचे दहशतवादी इतर गटांमध्ये सामील होऊ शकतात. हक्कानी नेटवर्कच्या नेत्यांवर 5 ते 1 दशलक्ष डॉलर्सची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...