आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तानच्या अँटी टेररिज्म कोर्टाने दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला अवैध फंडिंग प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी मीडियाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. हाफिज सईदला मागच्या वर्षी 17 जुलैला अटक झाली होती. हाफिज मुंबईतील 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहे.
सईदसोबत दोन आरोपी प्रो. जफर इकबाल आणि याह्या मुजाहिदला दोन प्रकरणात पाच-पाच वर्षांची आणि इतर एका प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, 1,10,000 रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे. यासोबतच, त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
हाफिज सईदविरोधात 41 गुन्हे
यापूर्वी फेब्रुवारीमध्येही हाफिजला लाहौरच्या एका न्यायालयाने टेरर फंडिंगच्या दोन प्रकरणात दोषी ठरवले होते. तेव्हा कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याच्याविरोधात दहशतवादी फंडिंग, मनी लॉन्ड्रिंगसह 41 गुन्हा दाखल आहेत.
हाफिज सईद लश्कर-ए-तैयबाचा संस्थापक आहे. 11 सप्टेंबर, 2001 मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने या संगटनेला परदेशी दहशतवादी संघटनेच्या यादीत सामील केले होते. 2002 मध्ये पाकिस्तानी सरकारनेही लश्करवर बंदी घातली होती. यानंतर हाफिज सईदने नवीन संघटना संगठना जमात-उद-दावाची स्थापना केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.