आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाँगकाँगमध्ये माध्यम समूहांच्या स्वातंत्र्याचे दमन केले जात आहे. त्यातही लोकशाहीवादी माध्यमांवर ही कारवाई केली जात आहे. सातत्याने चीनविरोधी भूमिका घेतल्याने अशा माध्यमांची मुस्कटदाबी केली जात आहे. चीनच्या बोटावर नाचणाऱ्या हाँगकाँगमधील सरकारने नियमांत सोयीचे बदल करून केवळ संशयाच्या आधारे दडपशाही सुरू केल्याचे चित्र दिसते. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्टनुसार हाँगकाँगमध्ये आतापर्यंत २० पत्रकारांवर अशी कारवाई करण्यात आली आहे. अशाच प्रकारची कारवाई गेल्या महिन्यात अॅपल डेलीच्या विरोधात झाली होती. तेव्हा स्वतंत्र पत्रकारांच्या या संस्थेला टाळे लागले होते. परदेशातील कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यात आले. आता पत्रकारांना व्हिसा देण्यास मनाई केली जात आहे.
चीनमध्ये तर सुमारे एक हजार पत्रकारांना नोकरी गमवावी लागली आहे. अनेक पत्रकारांना वैतागून हे क्षेत्र सोडून देण्याची वेळ आली आहे. यापैकी अनेक पत्रकार उदरनिर्वाहासाठी आता फूड होम डिलिव्हरीपासून टॅक्सी चालवण्यापर्यंतची कामे करू लागली आहेत. स्टँड न्यूजमध्ये डेप्युटी असाइनमेंट एडिटर पदावर राहिलेले रॉनसन चान हे देखील नोकरी गमावणाऱ्यांपैकी आहेत. त्यांना पत्रकारितेचा पेशा सोडावा लागला आहे. एकेदिवशी सुरक्षा दलाने त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यांच्या अपार्टमेंटची झडती घेऊन तपास अधिकारी चान यांना चौकशीसाठी घेऊन गेले. अधिकाऱ्यांनी चान यांचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त केले. अनेक पत्रकारांवर अटक झाली आहे.
एकाच वृत्तपत्रातील सहा जणांना डांबले
हाँगकाँगच्या स्टँड न्यूजच्या विविध कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर कथित देशविरोधी कागदपत्रे आढळल्याचा ठपका ठेवण्यात आला. या माध्यम समूहाने देशविरोधी वृत्तांकन प्रकाशित केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात मुख्य संपादक पॅॅट्रिक लॅम, माजी मुख्य संपादक चुंग पुई-कुएन, मंडळाचे सदस्य क्रिस्टिन फेंग, माजी सदस्य डेनिस हो, मार्गारेट एनजी, टाट-ची चाउ यांच्यासह इतर सहा जणांना अटक करून तुरुंगात डांबले आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने नंतर चान यांना टॅक्सीचालक म्हणून काम करावे लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.