आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला कारगिलची जखम देणाऱ्या मुशर्रफ यांचे निधन:पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ 7 वर्षांपासून होते दुबईत

दुबई/इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ (७९) यांचे रविवारी दुबईत निधन झाले. एमायलॉयडोिसस या दुर्मिळ आजाराने ग्रस्त मुशर्रफ यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. मुशर्रफ यांचा सोमवारी पाकिस्तानात दफनविधी केला जाईल. ते ७ वर्षांपासून दुबईतच होते. निर्वासित असताना त्यांनी पाकिस्तानला परतण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण ते जिवंत असताना पाकमध्ये जाऊ शकले नाहीत. त्यांचा जन्म दिल्लीत झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थायिक झाले होते.

लष्करप्रमुख म्हणून जनरल मुशर्रफ यांनीच १९९९ मध्ये तत्कालीन नवाज शरीफ सरकारला अंधारात ठेवून भारताविरुद्ध कारगिल युद्ध पुकारले होते. मात्र, भारतीय लष्कराने मुशर्रफ यांचे मनसुबे उधळून लावले. त्यानंतर मुशर्रफ यांनी शरीफ सरकार पाडून सत्ता मिळवली. मुशर्रफ २००१ ते २००८ पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी २००१ मध्ये मुशर्रफना चर्चेसाठी भारतात येण्याचे निमंत्रण दिले. मात्र, काश्मीरचा राग आळवल्याने आग्रा शिखर परिषद अपयशी ठरली. २००७ मध्ये बेनझीर भुत्तोंच्या हत्येनंतर मुशर्रफ यांचे पतन सुरू झाले. आणीबाणी लावून सत्ता वाचवण्याचा प्रयत्न केला, यावरून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालला. फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि, लाहोर हायकोर्टाने ती बदलली. मुशर्रफ मार्च २०१६ मध्ये दुबईला निघून गेले होते.

िबलावल यांची पोस्ट, ‘तू जिंदा रहेगी बेनझीर’ पाकचे परराष्ट्रमंत्री िबलावल भुत्तो यांनी रविवारी आपल्या टि्वटर अकाउंटच्या प्रोफाइल फोटोमध्ये आई बेनझीर यांचा फोटो लावून, ‘तू जिंदा रहेगी बेनझीर’ ही पोस्ट केली. बेनझीर हत्येप्रकरणी मुशर्रफ यांच्यावरही देशद्रोहाचा खटला चालला होता.

बातम्या आणखी आहेत...