आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण नेहमीच झाडावेलींत जीव असतो, असे ऐकत आलो आहोत. मात्र पहिल्यांदाच मशरूम आपापसांत संवाद साधतात, असा दावा करणारे संशोधन इंग्लंड विद्यापीठातील संशोधकांनी केले. त्यांच्या शब्दकोशात ५० शब्दही आहेत. इलेक्ट्रिकल्स इम्पल्सच्या (वीज तरंग) साह्याने तेही माणसांसारख्या गप्पा करतात. कधी आपल्यातील उत्साहाबद्दल परस्परांना सांगतात, तर कधी आपल्या वेदनांबद्दल बोलतात. युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंडचे प्रोफेसर अँड्रयू एडमॅटज्की यांनी हे संशोधन केले आहे. त्यांनी इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटी पॅटर्नचा सखोल अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. फंगसमध्ये मेंदू व चेतनाही असते, असा त्यांचा दावा आहे. त्यांचा शब्दकोश ५० शब्दांचा असूनही ते १५-२० शब्दांचाच वापर करतात. मशरूमचे इलेक्ट्रिकल इंपल्सेज माणसाच्या भाषेसारखेच असतात.
त्यांच्याकडे डझनावर शब्दांचे भांडार आहे. मशरूम आपसात हवामान, आगामी संकटाबद्दलच्या माहितीची देवाण-घेवाण करतात. रॉयल सोसायटी ओपन सायन्समध्ये याबद्दलचा लेख प्रकाशित झाला आहे. त्यात अँड्रयू म्हणाले, फंगसचा स्पायकिंग पॅटर्न व माणसाची भाषा यांच्यात काही संबंध आहे का, याविषयीची माहिती मिळालेली नाही. सर्व संशोधकांनी हा दावा पूर्णपणे स्वीकारलेला नाही. एक्सेटर विद्यापीठाचे के डॅन बेबर म्हणाले, यावर आणखी संशोधनाची गरज आहे. इलेक्ट्रिक अॅक्टिव्हिटीजना भाषा असे संबोधणे घाईचे ठरेल.
प्रत्येक फंगसच्या शब्दांत ६ अक्षरांचा समावेश
एनोकी, स्प्लिट गिल, घोस्ट व कॅटरपिलर या मशरूमच्या चार प्रजाती आहेत. त्याआधारे हे संशोधन झाले आहे. प्रत्येक फंगसच्या शब्दाची लांबी ६ अक्षरांची असते. मानवी मेंदूतील पेशींसारखे हे इम्पल्स आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.