आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅक्शनमध्ये मस्क ग्रुप:मस्कनी ट्विटरवर पकड घेण्यासाठी टेस्लाच्या विश्वस्तांना आणले, कपातीसाठी याद्या केल्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे मस्क यांचे गुंड : कर्मचाऱ्यांचा आरोप

द बर्ड इज फ्री (ट्विटर आता बंधनातून मुक्त आहे) अशी घोषित करणारे एलन मस्क, आता कंपनीवर आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मस्क आणि त्याच्या जवळच्या सल्लागार गटाने सर्वप्रथम आता उच्चपदस्थांसह इतर कर्मचाऱ्यांची यादी करण्यास सुरुवात केली आहे. विश्वस्तांसोबत बैठका घेत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकणे आणि कंपनीच्या संरचनेची पुनर्रचना करणे समाविष्ट आहे. कंटेंट मॉडरेशन पॉलिसी आणि जाहिरातदारांसह नवीन नियम फ्रेमवर्कदेखील तयार केला जात आहे. सल्लागारांव्यतिरिक्त, मस्कने त्याच्या इतर कंपन्या टेस्ला, स्पेसएक्स आणि द बोरिंग कंपनीचे सुमारे ५० अभियंते, प्रॉडक्ट लीडर आणि स्टाफला बोलावलेे आहे. आता ट्विटरच्या ७ हजार ५०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवण्याची भीती आहे. याबाबत कर्मचाऱ्यांच्या खासगी ग्रुप चॅटमध्ये भरपूर चर्चा सुरू आहे.

काही लोक मस्कच्या सल्लागारांना मस्कचे गुंडे म्हणत आहेत. गेल्या १० पैकी ८ वर्षांत ट्विटरने कोणताही फायदा घेतलेला नाही. तसेच मस्कने ते खरेदी करण्यासाठी १.०७ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे एलन मस्क यांना ट्विटरच्या माध्यमातून नफा मिळवून देणे आवश्यक आहे जेणेकरून कर्जावरील ८२३० कोटी रुपयांचे व्याज दरवर्षी भरता येईल. ट्विटरबद्दल मस्कसाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. पहिला म्हणजे मोबाइल अॅपमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणे आणि दुसरे म्हणजे ट्विटरला चांगल्या दर्जावर नेणे. याव्यतिरिक्त, मस्कच्या सल्लागारांनी ट्विटरच्या सत्यापन कार्यक्रमावर काम करण्यासाठी काही अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. याअंतर्गत लवकरच ट्विटरवर व्हेरिफिकेशन स्टेटस कायम ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला १६०० रुपये शुल्क भरावे लागेल. ट्विटर अकाउंंटवर ब्लू टिक दिले जाते, ज्याला व्हेरिफिकेशन म्हणतात.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे खाते लवकर पूर्ववत होण्याची शक्यता नाही मस्कने ट्विटर घेतल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पूर्ववत केले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण ते लवकर होण्याची शक्यता नाही. मस्कने नवीन कंटेंट मॉडरेशन कौन्सिलची स्थापना केली आहे. त्याबैठकीनंतर खाते पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

बातम्या आणखी आहेत...