आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट एलन मस्क ट्विटर डील केल्याने अडचणीत आल्याचे दिसून येते. या कराराला विराेध करणाऱ्या अनेक ब्ल्यू टिक युजर्सनी त्यांच्या नावे (मस्क) पॅॅराेडी अकाउंट बनवले आहेत. सामान्य युजर्सना ते मस्क यांचे अधिकृत अकाउंट वाटल्याने ते ट्विटसचे वाचन करत हाेते. आपल्या प्रतिमेवर वाईट परिणाम हाेत असल्याचे पाहून मस्क भडकले. असे करणाऱ्यांचे अकाउंट बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले. साेमवारी आफ्रिकन विनाेदवीर कॅथी ग्रिफिन यांचे अकाउंट बंद करण्यात आले. कॅथी आपले ब्ल्यू टिक अकाउंट मस्क यांच्या नावाने चालवत हाेत्या. अशा प्रकारचे अकाउंट चालवणाऱ्यांच्या विराेधात कडक नियम केले जातील. त्यातच आता मस्क यांनी कंपनीतून काढून टाकलेल्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा बाेलवायचे ठरवले आहे. यासंबंधी कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवले जात आहेत. याबाबत ट्विटरकडून अधिकृत काही स्पष्ट केले नाही.
फेसबुकही ट्विटरच्या मार्गावर, अनेकांना नारळ फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाव्हर्सने याच आठवड्यात अनेक कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. फेसबुकच्या महसुलात प्रचंड घट झाल्यामुळे कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. झुकेरबर्ग यांच्या मालकीच्या मेटाव्हर्समध्ये सुमारे ८७ हजार कर्मचारी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.