आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:मस्क यांनी कविता-कथा लिहिणारे सॉफ्टवेअर तयार करून घेतले; त्याचा मस्क यांनाच इशारा- रात्रभर ट्विट करणे बंद करा, नोकरी जाईल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कटू शब्दांचे रूपांतर चांगल्या शब्दांत करू शकते हे सॉफ्टवेअर

तुम्ही कवी किंवा कथालेखक व्हायचा विचार करत असाल तर तुमच्या मदतीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे (एआय) बनवलेले सॉफ्टवेअर तयार आहे. त्याला जेनेरेटिव्ह प्री-ट्रेंड ट्रान्सफॉर्मर ३ (जीपीटी-३) हे नाव देण्यात आले आहे. ते सॅनफ्रान्सिस्को स्थित ओपेनाई नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित लॅबने तयार केले आहे. टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क हेही लॅबच्या संस्थापकांपैकी एक आहेत. चाचणीदरम्यान अॅलन मस्क यांना त्यांच्या ट्विटच्या आधारावर या सॉफ्टवेअरने कथारूपात एक इशाराही दिला, तो असा आहे: ‘मस्क, तुमचे ट्विट सर्व बरबाद करू शकतात. तुम्ही रात्रभर जागून टि्वट करणे बंद केले नाही तर तुमची नोकरीही जाऊ शकते.’ त्याच्या उत्तरात मस्क कॉम्प्युटरला म्हणाले-‘तू असे का म्हणत आहेस, कॉम्प्युटर? मी वाईट ट्विट तर लिहीत नाही ना? मी तर आपले ट्विट कॅपिटल लेटरमध्येही लिहीत नाही. (इंग्रजीत कॅपिटल लेटरमध्ये ई-मेल किंवा कुठलीही पोस्ट लिहिणाऱ्याची नाराजी दर्शवते.) माझे ट्विट चांगले असतात असा मला विश्वास आहे.’ उत्तरात कॉम्प्युटरने म्हटले-‘पण तुमचे ट्विट बाजारात (शेअर मार्केट) उलथापालथ घडवू शकतात, त्यामुळे मी दु:खी आहे. तू जीनियस आणि अब्जाधीश आहेस, पण तू आम्हाला वारंवार बोअर करावे, असे नाही.’

हे सॉफ्टवेअर भाषिक मॉडेलच्या संकल्पनेवर तयार करण्यात आले आहे. त्याअंतर्गत सांख्यिकीचा वापर करून शब्द जोडण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्यात विकिपीडिया आणि अनेक पुस्तकांसोबतच इंटरनेटद्वारे कोट्यवधी पानांतील शब्द आणि वाक्ये जोडण्यात आली आहेत. उदाहरणार्थ सांख्यिकीनुसार जर आपण ‘लाल’ शब्दाचा वापर केला तर या शब्दासोबत बहुधा ‘गुलाबी’ शब्द वापरला जातो. अशा पद्धतीने जर या नव्या सॉफ्टवेअरचा वापर करणाऱ्या कॉम्प्युटरला एखादा शब्द देण्यात आला, तर तो त्याच्या वापरानुसार कविता किंवा कथेची रचना करून देऊ शकतो. अर्थात, एक कॉम्प्युटर ब्रह्मांडात असलेले सर्व शब्द आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने स्कॅन करू शकतो, त्यामुळे दिलेल्या कमांडनुसार कॉम्प्युटर सहजपणे तुम्हाला गरज असलेल्या अशा वाक्यांची रचना करू शकते.

कटू शब्दांचे रूपांतर चांगल्या शब्दांत करू शकते हे सॉफ्टवेअर
चाचणीत आढळले की, सांख्यिकी गणनेसोबत विविध भावनांचाही अनुवाद हे सॉफ्टवेअर करू शकते. आर्टिस्ट अर्रम सबेती यांनी सांगितले की, त्याच्या मदतीने हेरकथाही लिहिली आहे, त्यात हीरो हॅरी पॉटर असून त्याने एक सूट घातलेला आहे. पण त्याचे शर्ट चुरगळलेले आहे. बुटांना पॉलिश नाही. असे भाव कॉम्प्युटरने स्वत:च स्कॅन केले. संशोधक एलिएट टर्नर यांनी सांगितले की, हे सॉफ्टवेअर कटू शब्दांचे रूपांतर चांगल्या शब्दांत करू शकते.