आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Twitter वरून कमाईची योजना:मस्क म्हणाले – सरकारी आणि व्यावसायिक युजर्सकडून शुल्क आकारले जाऊ शकतात; सामान्य युजर्ससाठी विनामूल्य

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर हे 44 बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतले आहे. मस्क आता ते कसे चालवणार याविषयीही बरेच अंदाज बांधले जात आहे. ट्विटर यापुढे फ्री नाही, अशी माहिती समोर येत आहे. याबद्दल इलॉन मस्क यांनी ट्विट करून खुलासा केला आहे. या प्लॅटफॉर्मच्या व्यावसायिक आणि सरकारी युजर्संना वापरासाठी पैसे खर्च करावे लागतील. तर सामान्य युर्जंससाठी ट्विटर मोफत असेल की नाही, हे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ट्विटर नेहमीच कॅज्युअल युजर्ससाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते.

व्हेरीफाईड ट्विट एम्बेड करण्यासाठी किंवा कोट करण्यासाठी थर्ड पार्टी वेबसाइट्सकडून पैसे आकारण्यात येतील, असेही बोलले जात आहे. याशिवाय, मस्क यांनी ब्लू टिक प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवेमध्ये बदल सुचवले होते. ज्यात त्याची किंमत निश्चित करण्याची बाबदेखील समाविष्ट आहे. सध्या, ट्विटर प्रीमियम ब्लू सेवेची किंमत 2.99 डॉलर​​आहे.

एलोन मस्ककडे नोकरी मागत आहेत लोक -
इलॉन मस्कने ट्विटरला 44 बिलियन डॉलर्समध्ये विकत घेण्याचा करार करताच लोकांनी ट्विटरवर मस्ककडे नोकरी मागण्यास सुरवात केली आहे. पोलिंग अॅप tbh च्या सह-संस्थापक निकिता बियर यांनी ट्विट केले की मला ट्विटरसाठी उत्पादन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले जावे. आपण गेल्या 11 वर्षांपासून सोशल मीडिया अॅप्स डेव्हलप करत असल्याचे सांगितले.

इलॉन मस्कचा जुन्या व्यवस्थापनावर विश्वास नाही -
इलॉन मस्क यांना ट्विटरचा नवा सीईओ सापडल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याच्या नावाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, मस्क यांनी ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना कंपनीच्या व्यवस्थापनावर अजिबात विश्वास नसल्याचे सांगितले. सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशन (SEC) मध्येही त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी तो बोर्ड आणि अधिकाऱ्यांचा पगार कमी करणार आहे.

कर्मचारी रजेवर असू शकतात -
ब्लूमबर्गच्या एका अहवालात असेही म्हटले आहे की इलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी निधी उभारणीच्या प्रयत्नात नोकरदार कपातीची कल्पना मांडली होती. मात्र, या चर्चेवर आतापर्यंत ट्विटरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आगामी काळात ट्विटरला फेसबुकप्रमाणे पैसे कमवणारी कंपनी बनवण्याचा इलॉन मस्कचा प्रयत्न आहे. त्यावर ते विचारमंथन करत असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...