आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:मस्क यांनी ट्विटरला दिली सौदा रद्द करण्याची धमकी; आकडे लपवल्याचा आरोप

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटर ४,४०० कोटी डॉलरमध्ये (सुमारे ३.४१ लाख कोटी रुपये) खरेदी करण्याच्या प्रस्तावातून माघार घेण्याची धमकी दिली आहे. मस्क यांनी ट्विटरवर बनावट युजर अकाउंट्सचा डाटा लपवल्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ट्विटरकडून आम्हाला स्पॅम बॉट अकाउंट्स म्हणजे बनावट अकाउंट्सची पूर्ण माहिती दिलेली नाही. बनावट अकाउंट्सची गणना केल्यची माहिती न दिल्यास सौदा करण्याचा इशारा मस्क वकिलांनी पत्राद्वारे दिला आहे.

हे पत्र शेअर बाजार नियामक सेक्युरिटिज अँड एक्सचेंज कमीशनकडे (एसईसी) दाखल केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मस्क यांनी ९ मेपासून ते आतापर्यंत अनेकदा बनावट अकाउंट्सची माहिती मागितली, जेणेकरून ट्विटरच्या एकूण २२.९ कोटी अकाउंट्सपैकी किती बनावट आहेत, हे कळू शकेल. मात्र, ट्विटरने त्यांना माहिती दिली नाही. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्या मते, ५ टक्क्यांपेक्षा कमीच बनावट अकाउंट्स असल्याचा कंपनीचा अंदाज आहे. जाणकारांच्या मते, सर्वकाही ठीक राहिले तर मस्क-ट्विटर सौदा २४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होऊ शकतो. सौदा पूर्ण झाला नाही तर दोन्ही पक्ष बाहेर पडू शकतात.

बातम्या आणखी आहेत...