आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या इतिहासात प्रथमच मुस्लिमांनी न्यूयॉर्कच्या सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर नमाज अदा केली. या निमित्ताने या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले होते. मुस्लिमांनी टाइम्स स्क्वेअरसारख्या वर्दळीच्या ठिकाणी थेट रस्त्यावर नमाज अदा केल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच गरमागरम चर्चा सुरू झाली आहे. यात अनेकजण या घटनेचे समर्थन करत आहेत. तर काहीजण कडाडून विरोध करत आहेत.
इस्लाम शांततापूर्ण धर्म
गल्फ टूडेच्या वृत्तानुसार, टाइम्स स्क्वेअर सारख्या वर्दळीच्या ठिकाणी मुस्लिमांनी नमाज अदा करण्याची घटना अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी जगभरात शांततेचा संदेश पोहोचवण्यासाठी या ठिकाणी नमाज अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा केला आहे. इस्लाम शांततापूर्ण धर्म असल्याचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी रमजानच्या पवित्र महिन्यात न्यूयॉर्क शहराच्या या बहुचर्चित ठिकाणी साजरा करण्यात यावा अशी आमची इच्छा होती. त्यामुळे आम्ही टाइम्स स्क्वेअरवर नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित केला, असे त्यांनी म्हटले आहे. आयोजकांनी जगात इस्लामविषयी अनेक चुकीच्या धारणा असल्याचाही दावा केला आहे.
आयोजक म्हणाले -इस्लामची खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची आमची इच्छा होती. इस्लाम शांततेचा पुरस्कर्ता आहे. मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्याला शनिवारी सुरुवात झाली. चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान सुरू झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
अनेकांकडून टीका
या कार्यक्रमावर जगभरातील लोक टीका करत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या यूएईच्या हसन सजवानी यांचाही यात समावेश आहे. 'रस्त्यावर नमाज पठण केल्याने जनतेला त्रास होतो. एकट्या न्यूयॉर्कमध्ये 270 हून अधिक मशिदी आहेत. तिथे नमाज अदा करता येईल. धर्माचे असे जाहीर प्रदर्शन करुन लोकांचा रस्ता अडवण्याची काहीच गरज नाही. इस्लामने शिकवलेला हा मार्ग नाही,' असे ते म्हणाले.
अन्य एका यूझरनेही या प्रकरणी या घटनेचा विरोध केला आहे. 'मी एक मुस्लिम आहे. पण, टाइम्स स्क्वेअरवर नमाज अदा करण्यास माझा विरोध आहे. यामुळे इस्लाम हल्लेखोर किंवा घुसखोर असल्याचा चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे मशिदीच नमाज अदा करा,' असे त्याने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.