आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दहशतवादाचा अड्डा म्हणून कुप्रसिद्ध माेसूल शहराचा नूर पालटू लागला आहे. २०१७ मध्ये इस्लामिक दहशतवादी संघटनेच्या खात्म्यानंतर येथील मुस्लिम तरुणांनी २०० वर्षांची परंपरा असलेल्या सेंट थाॅमस चर्चच्या डागडुजीचे काम केले आहे. नाताळच्या निमित्ताने सुमारे ४५ हजार ख्रिश्चनांना परत बाेलावता येऊ शकेल, अशी आशा त्यांना वाटते. माेसूलची लाेकसंख्या सुमारे ६.७० लाख आहे. एकेकाळी येथे ४५ हजारांवर ख्रिश्चन लाेक राहत हाेते. परंतु, दहशतवाद्यांनी २०१४ मध्ये हल्ले करून एेतिहासिक चर्च उद्ध्वस्त केले आणि ख्रिश्चनांची लूट सुरू केली. त्यानंतर ख्रिश्चनांनी पलायन केले. मात्र, आता मुस्लिम तरुणांनी चर्चची सजावट केली. तरुणांनी आता एक माेहीम हाती घेतली आहे. ‘विस्थापितांनाे परत या, माेसूल तुमच्याविना अपूर्ण आहे..’ अशा आशयाची ही माेहीम आहे. या माेहिमेला प्रतिसाद म्हणून ५० ख्रिश्चन कुटुंबे माेसूलला परतली आहेत. चर्चला पुन्हा सावरणारा तरुण माेहंमद ईसम म्हणाला, हे चर्च दहशतवाद्यांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले हाेते. चर्चचे अंगण, फरशी व हाॅल ढिगाऱ्याखाली हाेता. ही गाेष्ट आयएसच्या नियंत्रणाची आठवण करून देणारी हाेती. आम्ही चर्च पुन्हा तयार करू शकत नव्हताे. परंतु, त्याची डागडुजी करण्याचा आमचा संकल्प हाेता.
माेसूलची धारणा बदलण्यासाठी पुढाकार
माेसूलबद्दलची जगाची धारणा बदलण्यासाठी ही माेहीम आम्ही राबवत आहाेत. या माेहिमेची सुरुवात केवळ पाच व्यक्तींपासून सुरू झाली. काही दिवसांतच त्यात अनेक लाेकांनी सहभाग घेतला. पाहता-पाहता आम्हाला निधीही मिळू लागला. काही लाेकांनी श्रमदानही केले. एक महिन्यानंतर चर्च फुलले. त्यानंतर ख्रिश्चन कुटुंबांना येथे येऊन नाताळ साजरा करण्याचे आवाहन केले. आता परतलेल्या विस्थापितांपैकी काही लाेक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जरूर येत आहेत.
१८००च्या दशकात साकारले हाेते सेंट थाॅमस चर्च
फादर राएड एडल म्हणाले, सेंट थाॅमस चर्चची स्थापना सन १८०० मध्ये झाली हाेती. विशेष म्हणजे हे माेसूलमधील पहिले चर्च आहे. तेव्हा येथे ख्रिश्चन कुटुंबे राहत नसत. चर्च तयार झाल्यानंतर येथे ख्रिश्चन लाेक राहू लागले. त्यांची संख्या वाढली. परंतु २०१४ मध्ये दहशतवाद्यांनी हे चर्च उद्ध्वस्त केले. त्याच भागामध्ये आता मुस्लिम तरुणांनी रचनात्मक पुढाकार घेतला आहे. माेसूलमध्ये ख्रिश्चन लाेकांची आता ये-जा हाेत असून वर्दळ वाढली आहे. त्यांच्याशी संपर्क केला जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.